शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

धार्मिक स्थळांवरून वाद

By admin | Updated: January 14, 2016 03:36 IST

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बांधल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांमुळे वाद उद्भवू लागले आहेत. एकाच जातीच्या लोकसंख्येचा आधार घेत ही बांधकामे केली जात आहेत. अशावेळी इतर

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईगृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बांधल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांमुळे वाद उद्भवू लागले आहेत. एकाच जातीच्या लोकसंख्येचा आधार घेत ही बांधकामे केली जात आहेत. अशावेळी इतर धर्मीयांच्या भावना दुखावत असून असा धार्मिक तिढा घणसोली येथे सिडकोनिर्मित वसाहतीमध्ये निर्माण झाला आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या नवी मुंबईत विविध जाती-धर्माच्या नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून देखील नवी मुंबई ओळखली जाते. त्यानुसार नवी मुंबईत स्थायिक होण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांसाठी सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबवलेले आहेत. अशा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सर्वधर्मीय नागरिक वास्तव्य करत आहे. अशातच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बांधली जाणारी अनधिकृत धार्मिक स्थळे वादाचा मुद्दा ठरु लागली आहेत. ज्या जाती-धर्मीय लोकांची संख्या जास्त असेल ते त्यांच्या संख्याबळावर त्यांच्या धर्माची प्रार्थनास्थळे बांधत आहेत. अशावेळी सोसायटीतल्या इतर धर्मीयांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या भावनेने धार्मिक तेढ निर्माण होत आहे. असाच धार्मिक तिढा घणसोली सेक्टर ९ घरोंदा येथील श्री सिध्दिविनायक सोसायटीमध्ये निर्माण झाला. सोसायटी कमिटीच्या मंजुरीने सोसायटी आवारात एक धार्मिक स्थळ उभारण्यात आले आहे. त्याकरिता सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाची केबिन तोडण्यात आलेली आहे. याचवेळी सोसायटीमधील काही सदस्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे बहुउद्देशीय सभागृह बांधण्याची सूचना मांडली असता कमिटीने त्यास मंजुरी देखील दिली. मात्र दीड वर्षापूर्वी मंजूर झालेला सभागृहाचा प्रस्ताव कमिटीने सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या बैठकीत फेटाळला. सोसायटी आवारात अनधिकृत बांधकाम नको असल्याचे कारण यावेळी सांगण्यात आले. मात्र मंदिर अनधिकृत उभारले जात असताना केवळ सभागृहाला विरोध का? यावरुन सोसायटीत धार्मिक तेढ निर्माण झाली. सोसायटीच्या बैठकांमध्ये चर्चेऐवजी वाद होवू लागल्याने सोसायटी अध्यक्ष महेंद्र खिल्लारी व सोसायटीत बौध्द समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरेश कांबळे यांनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रारही केली. हा वाद सोडवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी बैठक घेवून तोडगा काढण्याचे प्रयत्न करुनही तोडगा निघालेला नाही. त्याउलट कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोसायटीनेच कारवाईच्या नोटिसा बजावल्याने दोन धर्मीयांमध्ये तणाव निर्माण झाला. सोसायटी कमीटीकडून सर्व सदस्यांना समभावाची वागणूक दिली जाते. मंदिर बांधल्यानंतर सोसायटी आवारात इतर एकही अनधिकृत बांधकाम नको असा कमिटीचा निर्णय आहे. मात्र सभागृह अधिकृतपने बांधण्याबाबत सिडकोकडे पाठपुरावा सुरु आहे.- महेंद्र खिल्लारी, अध्यक्ष, श्री सिध्दिविनायक सोसायटी