शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 01:42 IST

पालिकेच्या स्थापनेला ४ वर्षांचा कार्यकाळ लोटला तरीदेखील अद्याप या ठिकाणच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा गाडा अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर आहे.

- वैभव गायकरपनवेल : कोविडमध्ये उद्भवलेल्या आरोग्याच्या परिस्थितीमुळे या वर्षी अर्थसंकल्पात सरकारने आरोग्यावर फोकस केला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील सहा नागरी प्राथमिक केंद्रांचा समावेश आहे. पालिकेच्या स्थापनेला ४ वर्षांचा कार्यकाळ लोटला तरीदेखील अद्याप या ठिकाणच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा गाडा अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर आहे.पालिका क्षेत्रात कोविड रुग्णांनी ३० हजारांचा पल्ला गाठला आहे. कोविड काळात या आरोग्य केंद्रांचा वापर अँटिजेन चाचण्या तसेच लहान आजारांवर औषधोपचार मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहेत. इतर वेळादेखील सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रांचा वापर करीत असतात. मात्र सध्याच्या घडीला ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी असल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची तब्बल १०५ पदे रिक्त असून केवळ ८० कर्मचाऱ्यांच्या आधारावर या आरोग्य केंद्राचे काम सुरू आहे. एकीकडे पालिकेच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतर कामाचा बोजा पडत आहे. लवकरात लवकर रिक्त पदे भरण्याची गरज आहे, यापूर्वी यापैकी काही आरोग्य केंद्रे सिडकोच्या ताब्यात होती. वर्षभरापूर्वीच या आरोग्य केंद्रांचे हस्तांतरण पालिकेकडे झाले आहे.७ डॉक्टरांची आवश्यकता असताना सध्याच्या घडीला केवळ ३ डॉक्टर पालिकेत कार्यरत आहेत. ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची जबाबदारी या ३ डॉक्टरांवर आहे. अद्यापही ४ डॉक्टरांची आवश्यकता असताना आणि पदे मंजूर असतानादेखील ४ डॉक्टरांची पदे अद्याप रिक्तच आहेत. विशेष म्हणजे १०५ रिक्त पदांमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात आरोग्य विभागाला अडचण निर्माण होत असून इतर कर्मचाऱ्यांवर हा भार पडत आहे.उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई, ठाणे मंडळ यांच्या माध्यमातून रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळाली आहे. लवकरच सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्याने या रिक्त जागा भरल्या जातील.- डॉ आनंद गोसावी (मुख्य वैद्यकीय अधिकारी , पनवेल महानगरपालिका )