शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

विनापरवाना होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण

By admin | Updated: October 23, 2015 00:22 IST

महापालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे विनापरवाना

नवी मुंबई : महापालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे विनापरवाना होर्डिंग्ज लागले आहेत. विशेष म्हणजे नवरात्रीत कोणत्याही प्रकारची होर्डिंगबाजी खपवून घेणार नाही, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र संबंधित विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे होर्र्डिंगबाजांनी पुन्हा तोंड वर काढल्याचे दिसून आले आहे.शहर विद्रूप करणाऱ्या बेकायदा होर्डिंगबाजीला आळा घालण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र स्मार्ट सिटीचे वेध लागलेल्या नवी मुंबईत मात्र या आदेशाला सपशेल हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. कारण या आदेशाची अंमलबजावणी करण्यात खुद्द प्रशासनाकडूनच हलगर्जीपणा केला जात असल्याने फुकट्या होर्डिंगबाजाचे चांगलेच फावले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सवादरम्यान, शहरात होर्डिंग, स्वागत कमानी व जाहिरात फलकांचा अतिरेक झाला होता. या पार्श्वभूमीवर नवरात्रीत अशाप्रकारच्या होर्डिंगबाजीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना आखल्या होत्या. विनापरवना होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी विभाग स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेची परवानगी न घेता होर्डिंग किंवा जाहिरात फलक लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे सूतोवाच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी केले होते. मात्र त्यानंतरही फुकट्या जाहिरातदारांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, घणसोली तसेच नेरूळ या भागात मोठ्याप्रमाणात विनापरवाना होर्डिंग लावण्यात आले आहेत. वाशी येथील अभ्युदय बँकेच्या समोरील चौकात तर दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंग्जची एकच भाऊगर्दी झाल्याचे पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे कोपरखैरणेतील डी मार्ट चौकात सुध्दा मोठ्याप्रमाणात होर्डिंग उभारण्यात आले आहेत. महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडून या प्रकाराकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केली जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. दरम्यान, या संदर्भात अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष इंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.