शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतरही शहरातील वाहतुकीला शिस्त लागेना; बेशिस्तपणाचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 04:52 IST

झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय ; नियमांना हरताळ

नवी मुंबई : बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर सतत वाहतूककोंडी होत आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असतानाही त्यांना शिस्त लागत नसल्याचेही दिसून येत आहे. परिणामी, झेब्रा क्रॉसिंगवरही वाहने उभी होत असल्याने रस्ता ओलांडणाºया पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

मागील दहा वर्षांत शहरातील वाहनसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यात दुचाकी व रिक्षांचे प्रमाण सर्वाधिक असून, वाहतुकीचे नियम मोडणाºयांमध्येही ते अग्रस्थानी आहेत. त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. यामुळे वाढती वाहतूककोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवार्इंचा धडाका सुरू आहे. त्यानंतरही वाहतुकीला शिस्त लागत नसल्याचा त्रास पादचाºयांना सहन करावा लागत आहे.

रस्त्याने अतिवेगात वाहने पळवणे, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहने उभी करणे, सिग्नल तोडणे, असे प्रकार सर्रासपणे वाहनचालकांकडून होत आहेत. केवळ समोर वाहतूक पोलीस उभे असल्याची चाहूल लागताच तात्पुरते शिस्तीचे दर्शन घडवले जाते. मात्र, वाहतूक पोलीस रस्त्यावर नसल्यास अनेकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होते. ठाणे-बेलापूर मार्गावर खैरणे येथील सिग्नल, वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपरखैरणे डी-मार्ट चौक, सानपाडा जंक्शन या प्रमुख ठिकाणांसह इतरही चौकांमध्ये हे दृश्य नजरेस पडत आहे. यामुळे त्या ठिकाणी रस्ता ओलांडणाºया पादचाºयांची गैरसोय होत आहे.

झेब्रा क्रॉसिंगवरच उभ्या असलेल्या वाहनांमधून वाट काढत त्यांना रस्ता ओलांडावा लागत आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा धाक निर्माण करण्यासाठी त्यांचे चालक परवाने निलंबित करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे; परंतु आरटीओकडून कारवाईची मोहीम राबवली जात नसल्याने बेशिस्त वाहनचालकांना प्रोत्साहन मिळत असल्याचीही टीका नागरिकांकडून होत आहे.ठाणे-बेलापूर मार्गावरील खैरणे (व्हाइट हाउस) येथील सिग्नल ओलांडताना पादचाºयांना जीव मुठीत धरावा लागत आहे. सिग्नल लागलेला असतानाही त्या ठिकाणी वाहने थांबत नसल्याने पादचाºयांच्या अपघाताचा धोका उद्भवत आहे. तर पुलाच्या उतारावरच हा सिग्नल असल्यानेही त्या ठिकाणी अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबई