शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ‘झोपु’ योजनेचा पुन्हा जागर

By admin | Updated: November 7, 2016 03:11 IST

शहरातील घरांच्या किमती गगनाला भिडल्याने आठ बाय आठच्या झोपड्यांचे भावही वधारले आहेत. यातच राज्य सरकारने या झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी पुन्हा ‘झोपु’ योजनेचा जागर सुरू केला आहे

कमलाकर कांबळे,  नवी मुंबईशहरातील घरांच्या किमती गगनाला भिडल्याने आठ बाय आठच्या झोपड्यांचे भावही वधारले आहेत. यातच राज्य सरकारने या झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी पुन्हा ‘झोपु’ योजनेचा जागर सुरू केला आहे. मुंबई, नवी मुंबईसह मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील सहा महापालिकांना ही योजना लागू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाची घाई करताना राज्य सरकारला प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी उभारलेल्या बांधकामांचा मात्र यावेळी सुध्दा विसर पडल्याचे दिसून येते. महापालिका हद्दीत सिडको, एमआयडीसी आणि शासकीय जमिनीवर झोपडपट्ट्यांचा विस्तार झालेला आहे. महापालिकेने २00१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ४१ हजार ८0५ झोपड्या आहेत. यापैकी १९९५ पूर्वीच्या पात्र ठरलेल्या १९,0८९ झोपड्या आहेत, तर अपात्र झोपड्यांची संख्या २२,७१६ आहे. यात सर्वाधिक झोपड्या एमआयडीसीच्या जागेवर आहेत. विशेष म्हणजे दिवसेंदिवस झोपड्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बहुतांशी झोपडपट्ट्यांवर परप्रांतीयांचा वरचष्मा आहे. या झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी झोपु योजना लागू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य सरकारची ही भूमिका स्वागतार्ह असली तरी असेच धोरण गरजेपोटीच्या बांधकामासंदर्भात का घेतले जात नाही, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे. सध्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. सिडको व महापालिकेने या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत असंतोष खदखदत आहे. गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी पडून आहे. यापूर्वीच्या आघाडी सरकारने या प्रश्नाला सोयीनुसार बगल दिली. परंतु आता दोन वर्षांपासून राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. या सरकारकडून तरी ही बांधकामे नियमित करणेबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी प्रकल्पग्रस्तांची अपेक्षा आहे. मात्र याच सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. आजही हजारो बांधकामे कारवाईच्या टप्प्यात आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाचे मूळ सुध्दा याच कारवाईमागे दडले आहे. अशा परिस्थितीत गरजेपोटीच्या बांधकामाबाबत प्राधान्याने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. असे असतानाही या प्रश्नाला बगल देत राज्य सरकारने बेकायदा झोपड्या अधिकृत करण्यासाठी घेतलेला निर्णय संभ्रम निर्माण करणारा असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे मत आहे.