शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील घरांच्या किमती स्थिर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:56 IST

रेडीरेकनरमध्ये नाममात्र वाढीची शक्यता; पाच टक्के जीएसटीतील सूट पथ्यावर

नवी मुंबई : रियल इस्टेट क्षेत्रात निर्माण झालेल्या मंदीच्या परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने या वेळी रेडीरेकनरमध्ये अत्यल्प म्हणजेच केवळ एक टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शिवाय, केंद्र सरकारने जीएसटीमध्ये पाच टक्के सूट दिल्याने याचा मोठा दिलासा सर्वसमान्य ग्राहक आणि पर्यायाने विकासकांना मिळणार आहे.शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने स्वस्त व परवडणारी घरे बांधणे विकासकांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून मागणी व पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेऊन या क्षेत्रातील अनिर्बंध व बेहिशोबी व्यवहाराला चाप लावला आहे. त्यानंतर लगेच जीएसटी व महारेरा कायदा कार्यान्वित केल्याने याचा मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला मोठा फटका बसला. मालमत्ता विकल्या न गेल्याने बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. तसेच दरवर्षी जाहीर होणाऱ्या रेडीरेकनरच्या वाढत्या दरामुळे घरांच्या किमतीत वाढ होत असते.नियमानुसार १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. आतापर्यंतच्या धोरणानुसार रेडीरेकनरमध्ये साधारणपणे १० ते १५ टक्के इतकी वाढ केली जाते; परंतु यावर्षी रेडीरेकनरमध्ये केवळ एक टक्का वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे समजते. यातच केंद्र सरकारने जीएसटीमध्येही पाच टक्के सूट दिल्याने घरांच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे, असे असले तरी सध्या लोकसभेची आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे १ एप्रिल रोजी रेडीरेकनरच्या नवीन दराची घोषणा होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.