शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

किमान वेतनासाठी शहरवासी धरले वेठीस, महापौरांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:36 AM

नवी मुंबई : कंत्राटी कामगारांनी किमान वेतनाच्या प्रस्तावाची तत्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मंगळवारी कामबंद आंदोलन केले.

नवी मुंबई : कंत्राटी कामगारांनी किमान वेतनाच्या प्रस्तावाची तत्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. यामुळे शहरात सर्वत्र कचºयाचे ढीग तयार झाले होते. कामगारांनी त्यांच्या मागणीसाठी शहर वेठीस धरल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हक्कासाठी आंदोलन करावे, परंतु त्यासाठी शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येईल व अत्यावश्यक सुविधांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी समाज समता कामगार संघाने आॅक्टोबर २०१६ पासून करण्यास सुरवात केली होती. महासभेने १९ मे २०१७ रोजी झालेल्या सभेमध्ये किमान वेतनाचा ठराव मंजूर केला व प्रशासनाने लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु प्रशासनाकडून या ठरावाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे कामगारांनी २० नोव्हेंबरला सायंकाळपासूनच कामबंद आंदोलन सुरू केले. यामुळे सोमवारी रात्री शहरात अनेक ठिकाणी पथदिवे लागले नाहीत. उद्यान व इतर ठिकाणचे विद्युत दिवेही बंद असल्याने खेळण्यासाठी गेलेल्या लहान मुलांची व विरंगुळ्यासाठी गेलेल्या नागरिकांचीही गैरसोय झाली. मंगळवारी दिवसभर शहरातील कचरा उचलण्यात आला नव्हता. सर्वच ठिकाणी दिवसभर कचºयाचे ढीग साचले होते. कचरा उचलण्यात आला नसल्याने दुपारनंतर सर्वत्र प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. घनकचरा, उद्यान, पाणी व इतर विभागातील सर्वच कामगारांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता.कंत्राटी कामगारांच्या संपामुळे शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगारांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करावे, परंतु त्यासाठी कामबंद करून नागरिकांना वेठीस धरू नये. सोमवारी रात्री पामबीच रोडसह सर्वच प्रमुख रोडवरील विद्युत व्यवस्था बंद होती. अंधारामुळे गंभीर अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. कामगारांनी उपोषण, काळ्या फिती लावणे व इतर मार्गांचा अवलंब करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कामगारांच्या शिष्टमंडळाने महापौर जयवंत सुतार यांची भेट घेतली.या भेटीमध्ये महापौरांनी कामगारांच्या मागण्या मान्य करून त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व कामगारांना तत्काळ किमान वेतन देण्यात यावे, याशिवाय किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी गेलेल्या कालावधीसाठीचा फरकही देण्यात यावा अशा सूचना त्यांनी केल्या.या बैठकीस माजी महापौर सागर नाईक, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नवी मुंबई स्वच्छता मिशन समितीच्या सभापती नेत्रा शिर्के, राष्ट्रवादी काँगे्रसचे पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक सूरज पाटील, राजू शिंदे उपस्थित होते. कामगारांच्या वतीने मंगेश लाड, गजानन भोईर, सुनील पटेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.कामगारांच्या प्रश्नावर प्रशासन सकारात्मकघनकचरा विभागाचे उपआयुक्त तुषार चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कामगारांना किमान वेतन देण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. आयुक्तांनीही कामगारांना याविषयी लवकरच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यानंतरही कामगारांनी बंद पुकारला. नाका कामगारांच्या माध्यमातून कचरा उचलण्यास सुरवात केली होती. बुधवारपासून पूर्ववत सर्व सुविधा सुरू होतील.>कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, ते लवकरच सोडविण्यात येतील. कामगारांना केलेल्या आवाहनानंतर त्यांनीही संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारपासून पूर्ववत कामकाज सुरू होईल.- जयवंत सुतार, महापौर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई