शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:56 IST

महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही.

नामदेव मोरे नवी मुंबई : महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही. अर्थसंकल्पातील सर्व महत्त्वाच्या योजना कागदावरच अद्याप असून, तीनही वर्षांचे अर्थसंकल्प प्रत्यक्षात अर्थहीन ठरले आहेत.नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला जातो व अशक्यप्राय वाटणारे प्रकल्प प्रत्यक्ष साकारण्यात येतात. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी पहिली महापालिका होण्याचा बहुमान मिळविला आहे. दुष्काळात सर्वत्र पिण्यासाठी पाणी मिळत नसताना नवी मुंबईमध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. देशातील सर्वात चांगली घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, भव्य मुख्यालय, आंबेडकर भवन, खासगी शाळांपेक्षाही चांगल्या दर्जाच्या पालिका शाळांच्या इमारती, तब्बल २०० उद्याने, देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारण्यात आली. पालिकेने स्वत:च्या खर्चाने ठाणे-बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण करून वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला. गत तीन वर्षांमध्ये महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला, परंतु प्रत्यक्षात एकही प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा प्रचंड खर्च करून शहराच्या लौकिकात भर टाकणारा कोणताच प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही.२०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये निधी नसल्यामुळे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मोठ्या योजना राबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. नवीन निवडून आलेल्या काही नगरसेवकांना एक वर्षामध्ये एकही महत्त्वाचे काम प्रभागात करता आले नव्हते. २०१६ - १७ या वर्षामध्ये तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संवाद पूर्णपणे थांबला होता. यामुळे एकही महत्त्वाची योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. पालिकेने अर्थसंकल्पामध्ये मोरबे धरण सुशोभीकरण, मोरबे धरण सौरऊर्जा प्रकल्प, सागरी किनारा सुशोभीकरण, आगरी कोळी सांस्कृतिक भवन, गवळीदेव पर्यटन केंद्र, अडवली भुतावलीमध्ये निसर्ग उद्यान विकसित करणे, छत्रपती शिवाजी महाराज, थोर राष्ट्रीय पुरुष व शहीद व्यक्तींचे स्मारक उभारणे, वॉटर बॉडी विकसित करणे, शहर संग्रहालय, कृत्रिम चौपाटी विकसित करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु यामधील कोणतीच योजना प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकलेली नाही. बाल भवन, तरण तलावासह सर्व योजना कागदावर आहेत. विशेष प्रकल्प राबविण्यात आलेला नसतानाही तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च झाले असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून पुढील वर्षभरात तरी भविष्याचा वेध घेऊन विकास योजना राबविल्या जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रकल्पाचे नाव तरतूद खर्चसागरी किनारा सुशोभीकरण १० लाख ०गवळीदेव पर्यटन स्थळ १ लाख ०प्रवेशद्वार ५ कोटी ०महापुरूषांची स्मारके १२ कोटी ०वॉटर बॉडी सुशोभीकरण १० कोटी २७ लाखशहर संग्रहालय १ कोटी ०कृत्रिम चौपाटी ५ कोटी ०सायंटिफिक म्युझियम २ कोटी ०नाना नानी पार्क ५० लाख ०वंडर्स पार्क संगीत कारंजे २ कोटी ०रात्र निवारा केंद्र ४ कोटी ३ लाखज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र १ कोटी ७६ लाख ०पक्षी व प्राणी संग्रहालय १० लाख ०श्वान नियंत्रण केंद्राची उभारणी ६ कोटी ०क्रीडा संकुल बांधणे १६ कोटी ५३ लाख २ कोटीतरण तलाव ५ कोटी ०