शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

राजदूतावासाच्या जागेवर आता थीम सिटी, सिडकोचा निर्णय, शहरातील दुसरा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 4:42 AM

आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, ऐरोलीतील रखडलेला राजदूतावासाचा प्रकल्प सिडकोने रद्द केला आहे.

- कमलाकर कांबळे ।नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, ऐरोलीतील रखडलेला राजदूतावासाचा प्रकल्प सिडकोने रद्द केला आहे. या प्रकल्पासाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर आता थीम सिटी साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यादृष्टीने चाचपणी सुरू करण्यात आल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिली.ऐरोली सेक्टर १0 ए येथे २७.३ हेक्टर जागेवर सिडकोने आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्राचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. या प्रस्तावित प्रकल्पात विविध देशांचे राजदूतावास आणि वकिलातींचा समावेश करण्याची योजना होती. विशेष म्हणजे, सुरक्षेसाठी यात ट्रिपल लेअर प्रणाली प्रस्तावित करण्यात आली होती. उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा, दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काहीच अंतरावर हा प्रकल्प असल्याने त्याला विविध देशांतील वाणिज्य दूतावासांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा सुरुवातीला सिडकोला विश्वास वाटत होता; परंतु सलग नऊ वर्षे प्रयास करूनही या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. दरम्यान, हा प्रकल्प अनेक वर्षे रखडल्याने त्यासाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर अतिक्रमण होऊ लागले आहे. डेब्रिजमाफियांनी या भूखंडावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले आहे. आणखी काही काळ हा भूखंड असाच मोकळा राहिल्यास भूमाफियांकडून तो गिळंकृत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाची थीम सिटी साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली असून, सध्या या प्रस्तावित सिटीचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वी सिडकोने मुंबईच्या बीकेसीच्या धरतीवर खारघर कार्पोरेट पार्कचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे ऐरोलीतील नियोजित थीम सिटी हा सिडकोचा दुसरा प्रकल्प ठरणार आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे नवी मुंबईचे महत्त्व आणखी वाढणार आहे.हिरे, सोन्याची बाजारपेठ उभारण्याचा होता प्रस्तावआंतरराष्ट्रीय दूतावासाचा प्रकल्प रद्द केल्यानंतर त्या जागेवर फॅशन टेक्नॉलॉजी प्रकल्प उभारण्याचा सिडकोचा प्रस्ताव होता; परंतु संबंधित विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने तो गुंडाळण्यात आला. त्यानंतर याच जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची हिरे, सोने व चांदीची बाजारपेठ उभारण्याची संकल्पाना होती; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकल्पसुद्धा कागदावरच सीमित राहिला.सातत्याने पाठपुरावा करूनही आंतरराष्ट्रीय दूतावासाच्या प्रकल्पाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. सध्या त्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची थीम सिटी उभारण्याची संकल्पना आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.- भूषण गगराणी,व्यवस्थापकीय संचालक, सिडको