शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव श्वानांची नोंदणी करण्यासाठी नागरिक उदासीन; महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 07:38 IST

वर्षभरात ५४ नवीन श्वानांची नोंदणी

योगेश पिंगळेनवी मुंबई : भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्याबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात केली जाते. शहरवासीयांचे श्वानप्रेम गेल्या काही वर्षांत चांगलेच वाढले आहे. यामुळे पाळीव श्वानांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. श्वान पाळणारे नागरिक त्यांच्या रीतसर नोंदणीबाबत उदासीन असून या प्रकाराकडे महापालिकादेखील दुर्लक्ष करत आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये २०२०-२१ या वर्षांत केवळ ५४ नवीन पाळीव श्वानांची नोंद झाली असून, ६५ श्वानांच्या परवान्यांचे नूतनीकरण पालिकेकडे झाले आहे.

नवी मुंबई शहरात श्वान निर्बीजीकरणाचे प्रमाण अधिक असले तरी पाळल्या जाणाऱ्या श्वानांची महापालिकेकडे नोंदणी करण्याचे प्रमाण मात्र अल्प आहे. दरवर्षी शहरातील पाळीव श्वानांची नोंदणी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर श्वान पाळण्याचा परवाना मिळतो. श्वानाला अँटिरेबीज लस दिल्याची खात्री करून दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण केले जाते. नवी मुंबईत पाळीव श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र पालिकेकडून प्राप्त झालेल्या नवीन श्वानांची नोंदया आकडेवारीनुसार श्वान मालक महापालिकेकडे नोंदणी करत नसल्याचे समोर आले आहे.

श्वानांच्या गळ्यात नाहीत बॅच महापालिकेकडे श्वानांची नोंदणी केल्यास श्वान मालकाला परवाना दिला जातो. श्वानाच्या गळ्यात बांधण्यासाठी बॅचदेखील दिला जातो. परंतु अनेक नोंदणी केलेले श्वान मालक श्वान पाळण्याचा परवाना घेतल्यानंतरदेखील श्वानांच्या गळ्यात बॅच बांधत नाहीत. नोंदणी केलेल्या श्वानांच्या परवान्यांचे नूतनीकरणदेखील होत नसून श्वान मालकांकडून केल्या जाणाऱ्या नियमांच्या उल्लंघनाकडे पालिका दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका