शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ई-टॉयलेटचा नागरिकांनी घेतला धसका

By admin | Updated: February 12, 2017 03:19 IST

स्वच्छ शहर अभियानांतर्गत महापालिकेने शहराच्या विविध भागात ई-टॉयलेट उभारले आहेत; परंतु अनेकदा यात तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे नागरिक टॉयलेटमध्ये

- विजय आहिरे,  नवी मुंबर्ईस्वच्छ शहर अभियानांतर्गत महापालिकेने शहराच्या विविध भागात ई-टॉयलेट उभारले आहेत; परंतु अनेकदा यात तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे नागरिक टॉयलेटमध्ये अडकण्याचे प्रकार घडत आहेत. वाशीच्या मिनी सी-शोअरवर अलीकडेच घडलेल्या एका प्रकारात आत अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यासाठी चक्क अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली. या प्रकारामुळे नागरिकांनी या टॉयलेटचा चांगलाच धसका घेतला आहे. स्वच्छ शहर अभियानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज झाले असून त्यानुसार हागणदारीमुक्त शहर करण्याच्या दृष्टीने जोरदार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी ई-टॉयलेट व शी टॉयलेट उभारण्यात आले आहेत. वाशी विभागात दोन, पामबीच मार्गावर चार ई-टॉयलेट आणि वाशी डेपोत महिलांसाठी एक शी टॉयलेट उभारण्यात आले आहे. हे टॉयलेट उभारण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या देखभालीची जबाबदारीही याच कंपनीवर टाकण्यात आली आहे, असे असले तरी अनेक ठिकाणी या ई-टॉयलेटमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचे दिसून आले आहे. वाशीच्या मिनी सी-शोअर येथे विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी व सायंकाळी हा परिसर गजबजलेला असतो. नागरिकांच्या सुविधांसाठी महापालिकेने या ठिकाणी ओपन जिमसुद्धा सुरू केली आहे. तसेच येथील राजीव गांधी जॉगर्स पार्कच्या दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ ई-टॉयलेटची (एमआय टॉयलेट) सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या टॉयलेटमध्ये एक नागरिक अडकल्याची घटना घडली होती. या टॉयलेटमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी पिवळे बटण आहे; परंतु हे बटण दाबूनही टॉयलेटचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सदर नागरिकाने मोबाइलवरून आपल्या मित्राशी संपर्क साधला व सुटका करून घेतली. अशाच एका प्रकारात आत अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यासाठी चक्क अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले होते. अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी या टॉयलेटच्या वापराचा धसका घेतल्याचे दिसून येते. आपतकालीन परिस्थितीत पिवळे बटण दाबावे, अशा स्पष्ट सूचना ई-टॉयलेटच्या दर्शनी भागात देण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिक या सूचनांचे पालन करण्याऐवजी तोडफोड करत आहेत. अनेक वेळा तांत्रिक बिघाडामुळे अशा घटना घडतात. - हेमंत पावरा, शाखा अभियंता, सी-विभाग, वाशी.