शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संप मागे घेतल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी 

By वैभव गायकर | Updated: March 21, 2023 12:31 IST

मागील सहा  दिवसांपासून जुनी पेन्शन याेजना लागू करण्याच्या मागणीसाठी‎ महसूल विभागासह इतर विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर होते.

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: मागील सहा  दिवसांपासून जुनी पेन्शन याेजना लागू करण्याच्या मागणीसाठी‎ महसूल विभागासह इतर विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर होते.सोमवारी दि.20 रोजी संप मिटल्याची घोषणा कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी शासकीय कामकाज सुरळीत झाले.सहा दिवसामुळे ठप्प झालेली कामे करण्यासाठी नागरिकांनी पनवेल तहसील कार्यालयात मोठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

या संपाचा परिणाम शासनाच्या तिजोरीवर देखील पडला.संपामुळे मार्च अखेरच्या महसूल वसुलीच्या‎ कामांना ब्रेक लागला आहे. संपामुळे  प्रांत व तहसील कार्यालयांमध्ये‎ शुकशुकाट कायम आहे.‎ 14 मार्चपासून शासकीय व निमशासकीय‎ कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता.संपाचा महसूलच्या दैनंदिन कामकाजावर‎ विपरित परिणाम झाला हाेता. यामध्ये विद्यार्थ्यांचे विविध दाखले ,बिनशेती प्रकरणे, फाैजदारी‎ प्रकरणे, हद्दपार प्रकरणे, प्रतिज्ञापत्र‎ साक्षांकन, महसूल संकलन, टपाल‎ विभाग, अकस्मात मृत्यू प्रकरणे यासह‎ पुरवठा विभागाशी निगडीत कामे ठप्प‎ आहेत.एकीकडे शाळा प्रवेशाची धामधूम सुरु असताना त्यातच संप यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली होती.पनवेल तालुका रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा व सर्वात जास्त महसूल गोळा करणारा तालुका आहे.या संपाचा परिणाम सर्वावर झाला आहे.संपामुळे प्रतिज्ञापत्र सारखी कामे रखडली होती.संप लांबणीवर पडल्याने आमच्या कामावर परिणाम झाला असल्याचे ऍडव्होकेट सचिन कांबळे यांनी सांगितले.

संप मागे घेतल्याने तहसील कार्यालयात विविध शाखांचे काम सुरळीत झाले आहे.नागरिकांची सर्व कामे यापुढे सुरळीत चालु राहतील. - विजय तळेकर (तहसीलदार,पनवेल)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :panvelपनवेल