शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:23 IST

गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

पनवेल : गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.शुक्रवार, २८ जूनपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. मात्र दर दिवशी वीज पुरवठा खंडित होत आहे. जुनाट केबल, गंजलेले विजेचे खांब, उघड्या डीपी यामुळे वीज जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सतत वीज खंडित होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री कोणत्याही वेळी वीज गायब होत असल्याने नक्की वीज कोणत्या वेळेला असते असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. वारंवार वीज गायब होत असली तरी देखील वीज बिल कमी होण्याचे नाव घेत नाही. पनवेल तालुक्यात महावितरणचे लाखो वीज ग्राहक आहेत. मात्र दररोज त्यांना विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे.तालुक्यातील मोरबे कोंडले परिसरात दोन दिवसात विजेचा खांब पडल्याने त्यांना रात्रभर अंधारात राहावे लागले. तर शुक्रवारी ४ तास, शनिवारी ३ तास, रविवारी ४ तास व सोमवारी सकाळी ७ वाजता गेलेली वीज दुपारी १२ वाजता आली. तालुक्यातील गावांमध्ये वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना कित्येक तास विजेविना राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात वीज नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिवसभरात १० ते १२ वेळा वीज गूल असते. सततच्या विजेच्या जाण्यामुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत. दिवसा वीज जातेच शिवाय रात्री देखील वीज जात असल्याने व्यवस्थित झोप देखील मिळत नसल्याची व्यथा नागरिक मांडत आहेत. दिवसातील चार ते पाच तास वीज नसते. विजेची समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :panvelपनवेल