शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

पनवेलसह शहरात मुसळधार; विविध भागांमध्ये पाणी साचले; ७ ठिकाणी वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:11 IST

मुसळधार पावसाने नवी मुंबईसह पनवेलला झोडपले. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून, महामार्गावर अपघात झाल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

नवी मुंबई, पनवेल : मुसळधार पावसाने नवी मुंबईसह पनवेलला झोडपले. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून, महामार्गावर अपघात झाल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पनवेलमध्ये इमारत कोसळण्याचीही घटना घडली आहे.नवी मुंबईसह पनवेल परिसरामधील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले होते. मुंबईमध्ये रेल्वेपूल कोसळल्यामुळे अनेकांना कार्यालयात पोहोचता आले नाही. हार्बर मार्गावरील लोकलही उशिराने धावत होत्या. सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ पाणी साचल्याचा परिणामही वाहतुकीवर झाला होता. तुर्भे येथे मिनीबसचा अपघात झाल्यामुळे सानपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहारावरही परिणाम झाला होता. भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांना व नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला होता. मार्केट परिसरामधील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.वारंवार तक्रारी करूनही येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील भुयारी मार्गांमध्येही पाणी साचले होते.ठाणे-बेलापूर रोडवर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापे येथे भुयारी मार्ग तयार केला आहे; परंतु या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे त्याचा फटका वाहतुकीस बसू लागला आहे.औद्योगिक वसाहतीमधील नैसर्गिक नाल्यांमध्ये डेब्रिज व इतर कचरा टाकला असल्यामुळे नाल्यातील पाणी रोडवर येऊ लागले आहे. ऐरोलीमधील बस डेपोसह अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पनवेलमध्येही अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली होती. इमारत कोसळल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मलमिश्रीत पाणी रस्त्यावरमुसळधार पावसामुळे सारसोळे गावामध्ये मलमिश्रीत पाणी रस्त्यावरून वाहत होते. मलवाहिन्या तुंबल्याने जागोजागी ही परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पादचाºयांसह परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी पालिका अधिकाºयांना ही बाब कळवली असता, सफाई कामगारांनी तुंबलेल्या मलवाहिन्या सफाईचे काम हाती घेतले; परंतु पावसाळ्यापूर्वीच जर योग्यरीत्या नाले, गटारे व मल:निसारण वाहिन्यांची साफसफाई झाली असती, तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. मात्र, अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे सारसोळेवासीयांना दूषित पाण्यातून चालावे लागत असल्याचाही संताप मेहेर यांनी व्यक्त केला.पावसात खड्डे बुजविण्याचा प्रयत्नमहापालिका अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे शहरात काही ठिकाणी पाऊस सुरू असताना रोड व पदपथांची कामे सुरू आहेत. नेरूळ सेक्टर २० मध्ये रोडचे डांबरीकरण करण्यात आले आहे. गोठविली गावामध्ये मुसळधार पावसामध्ये खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पावसात सुरू असलेल्या या कामाविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.लोकलचीगती मंदावलीपावसामुळे पनवेल-सीएसएमटी तसेच ठाणे-वाशी मार्गावरील लोकलवरही परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे समोरील परिस्थितीचा अंदाज येत नसल्याने लोकल धिम्या गतीने पळवल्या जात होत्या, यामुळे सर्वच लोकल नियोजित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. याचा त्रास रेल्वेप्रवाशांना सहन करावा लागला.भुयारी मार्गात पाणीप्रतिवर्षी पावसाळ्यात शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांचे पादचारी, तसेच वाहनांचे भुयारी मार्ग पाण्याखाली जातात. त्यानुसार मंगळवारीही कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगतच्या भुयारी मार्गात सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. एरवी त्या ठिकाणी साचणारे पाणी मोटार लावून बाहेर काढले जाते. मात्र, कायमचा तोडगा म्हणून त्या ठिकाणी पाझरणारे पाणी कायमचे बंद करण्याची शक्कल अद्याप अभियंत्यांना सुचलेली नाही, त्यामुळे मंगळवारी पावसाचा जोर वाढताच त्या ठिकाणी पाणी साचून रहदारीच्या मार्गात अडथळा झाला.वाशीत रस्त्यावर तळेसेक्टर ९ परिसरातील जलमय होऊन रस्ते पाण्याखाली जात आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांकडून रस्त्यालगतच्या गटारांमध्ये कचरा टाकला जात असल्याने पाणी तुंबून ते रस्त्यावर साचत आहे. परिणामी, मुसळधार पाऊस झाल्यास परिसरातील घरांमध्येही पाणी शिरण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते गणेश मिलखे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई