शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेटची थोटकं अन् बाटल्यांचा खच! मैदानाबाहेर उघड्यावरच मद्यपान : तरुणाई नशेत धुंद

By नामदेव मोरे | Updated: January 21, 2025 10:57 IST

Cold Play: ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणाईकडून डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम परिसरात उघड्यावरच मद्यपान व धूम्रपान केले जात आहे. परिसरात सिगारेटची थोटके व मद्यपींच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणाईकडून डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम परिसरात उघड्यावरच मद्यपान व धूम्रपान केले जात आहे. परिसरात सिगारेटची थोटके व मद्यपींच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र आहे. तरुण-तरुणी नशेमध्ये असल्यामुळे नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

तीन दिवस ‘कोल्ड प्ले’चे आयोजन केले आहे. यासाठी देशभरातून रोज ५० हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक हजर राहात आहेत. प्रेक्षकांमध्ये तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. उरण फाट्याकडील पादचारी पूल ते एलपी बस स्टॉप व विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर तरुणांचे जथ्थे उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामधील अनेकजण उघड्यावरच मद्यपान व धूम्रपान करत असल्याचेही पाहायला मिळाले. 

पोलिस बंदोबस्त असूनही उघड्यावर धूम्रपान सुरूरस्त्याच्या बाजूला, पदपथ व कचराकुंडीजवळ दारूच्या बाटल्यांचा खच दिसला. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असूनही उघड्यावर धूम्रपान व मद्यपान सुरू होते. उघड्यावर मद्यपान करण्यास परवानगी दिली आहे का? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत होते.  विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस मद्यविक्रीच्या दुकानात मद्य खरेदीसाठी गर्दी दिसली. मागील बाजूला असलेल्या एमआरएफ दुकानासमाेरील कठड्यावरही अनेकजण मद्यपान करण्यास  बसत आहेत. १२ मोबाइल चोरीलाकोल्ड प्ले बँडच्या तालावर थिरकणाऱ्यांमध्ये मोबाइल चोरटे वावरत आहेत. पहिल्या दिवशी पाच मोबाइल चोरीच्या घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सात मोबाइल चोरीला गेले आहेत. त्यामध्ये पाच मोबाइल स्टेडियममधून, तर दोन परिसरातून चोरीला गेले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई