शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

अपयश लपविण्यासाठी सिडकोची धडपड

By admin | Updated: May 22, 2016 02:23 IST

नैना प्रकल्प अपेक्षीत गतीने पुढे जात नसल्याची खंत महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. परंतू सिडको प्रशासन मात्र या परिसरातील विकास अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचे मान्य करत नाही

नामदेव मोरे, नवी मुंबईनैना प्रकल्प अपेक्षीत गतीने पुढे जात नसल्याची खंत महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. परंतू सिडको प्रशासन मात्र या परिसरातील विकास अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचे मान्य करत नाही. रखडलेल्या विकासाचे खापर विकासकांवर फोडले जात आहे. सिडको विरोधात आवाज उठविणारेच चुकिचे काम करत असल्याचा आरोप केला जात आहे. शहरातील बांधकाम व्यावसायीकांनी पत्रकार परिषद घेवून ठरावीक अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळेच नैना परिसरातील विकास रखडला असल्याचा आरोप केला होता. परंतू सिडकोने हे आरोप साफ फेटाळून लावले. अरिहंत बिल्डर नियम बदलण्यासाठी दबाव आणत असून त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. अरीहंत समुहाच्या छाजेर यांनी तिन वर्षापासून परवानगीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले होते. परंतू नैना चे अतिरिक्त मुख्य नियोजनकार व्ही वेणुगोपाल यांनी छाजेर हे खोटे बोलत आहेत. त्यांनी डिसेंबर २०१५ मध्ये प्रस्ताव सादर केला असल्याचे स्पष्ट केले होते. सिडकोच्या संकेतस्थळावरही अरिहंत समुहाचा प्रस्ताव १ डिसेंबर २०१५ रोजी प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रस्तावास परवानगी नाकारली असल्याचा उल्लेख केला आहे. परंतू सिडकोने स्वत:ची बाजू खरी असल्याचे भासविण्यासाठी चुकीचा खुलासा दिला आहे. अरिहंत समुहाने १८ मार्च २००३ मध्ये इमारतीचा आराखडा सादर केला होता. यानंतर अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला व इतर कागदपत्रेही सादर केली होती. मार्च २०१४ मध्ये ३३ लाख ३५ हजार रूपये छाननी शुल्कही भरले आहे. याची नोंद सिडको कार्यालयामध्ये असून विकासकाकडेही छायांकीत प्रती आहेत. असे असताना डिसेंबर २०१५ ला प्रस्ताव सादर केल्याचा दावा चुकिचा असल्याचे छाजेर यांनी स्पष्ट केले आहे. नैना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. या परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपविल्यानंतरही शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. परंतू सिडकोने ती बांधकामे कधीच थांबविलेली नाहीत. आत्महत्या केलेले बिल्डर राज कंधारी यांचा वाकडी येथे प्रकल्प आहे. सिडकोने वेळेत परवानगी दिली नसल्याचे त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट करताच सिडकोने यामध्ये तथ्य नाही. कंधारी यांनी परवानगी न घेताच तिन मजल्यापर्यंत बांधकाम केले असल्याचा दावा केला होता. सिडकोला हे वास्तव माहीती असताना वेळेमध्ये बांधकाम का थांबविले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तवामध्ये सिडकोविरोधात आवाज उठविणाऱ्यांच्या चुका काढून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल नवी मुंबईतील व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली.२९ परवानग्या भूषण आहे का? सिडकोने तिन वर्षामध्ये २९ प्रकल्पांना परवानग्या दिल्या असूनन २२२ प्रकल्पांना परवानगी नाकारली हा आकडा सिडको व बिल्डर सर्वांसाठीच भुषणावह नाही. मोठ्या प्रमाणात प्रस्तावांमध्ये त्रुटी असतील तर त्यासाठी बिल्डर, शासन व सिडको यांनी समन्वयाने मार्ग काढला पाहिजे. परंतू तसे काहीच प्रयत्न झालेले नाहीत. विकास कामे ठप्प झाली असताना ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे रज असल्याचे मत व्यक्त होत आहे. २२१ बिल्डर गप्प का?नैना परिसरातील २२२ बिल्डरांचे प्रस्ताव रद्द केले आहेत. परंतू कोणीही तक्रार केलेली नाही. फक्त अशोक छाजेर हेच आरोप करत असल्याची टिका सिडकोने केली आहे. छाजेर हे दबाव आणत असल्याचा आरोपही केला आहे. परंतू २२१ बिल्डरांनी आवाज उठविला नाही कारण, प्रशासनाचे दुष्मणी घेतली तर भविष्यात प्रकल्पात अडथळे वाढविण्याची त्यांना शक्यता आहे. प्रस्ताव नाकारण्यात आलेल्या बिल्डरांमध्ये सिडको विषयी असंतोष निर्माण होत आहे.