शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

अनेक भूधारकांकडून भूखंडाचा विकास नाही, सिडकोचा दणका, १६ भूखंड केले रद्द

By कमलाकर कांबळे | Updated: April 5, 2025 13:14 IST

CIDCO News: अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोने कारवाईचा आसूड उगारला आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई - अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोने कारवाईचा आसूड उगारला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात वाटप केलेले १६ भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून या भूखंडांवर जप्तीचaी कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित भूखंडधारकांचे धाबे दणाणले आहेत. 

सिडको भूखंडाचे वाटप झाल्यापासून निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण करून भोगवटा प्रमाणपत्र घेणे नियमाने बंधनकारक आहे.  मात्र, अनेकांनी आपल्या भूखंडांचा विकास केला नसल्याचे आढळले आहे. त्याचप्रमाणे अनेक भूधारकांनी अतिरिक्त भाडेपट्टा आणि सेवाशुल्क थकविल्याचे निदर्शनास आले आहे, अशा भूधारकांसाठी सिडकोने अभय योजनेतून थकीत रकमेवर ५० टक्के सवलत दिली होती. या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी अनेक भूधारकांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे अशा १६ भूधारकांना सिडकोने नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या भूखंडांचे वाटप रद्द करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 

भूखंडांची किंमत दाेन हजार कोटीरद्द करण्यात आलेले भूखंड ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघर तसेच द्रोणागिरी नोडमधील आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७५,००० चौरस मीटर इतके आहे. बाजारभावाप्रमाणे त्याची किमत दोन हजार कोटीच्या घरात असल्याचा अंदाज आहे.  यातील काही भूखंड १० ते २५  वर्षांपासून वापराविना पडून आहेत. कोपरखैरणेतील चाणक्य गृहनिर्माण सोसायटीने प्राप्त भूखंडावर बांधकाम करून निवासी वापर सुरू केला असला, तरी भोगवटा प्रमाणपत्र नाही. नेरूळ येथील सिडको कर्मचाऱ्यांच्या स्नेह पुष्प सोसायटीस दिलेल्या भूखंडाचा विकास न करता त्याची परस्पर विक्री केल्याची तक्रार आहे.

अभय योजनेकडे पाठ अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवा शुल्कापोटी सिडकोचे ९०० कोटी रुपये अडकून आहेत. अभय योजनेअंतर्गत ५० टक्के  सूट दिल्याने  किमान साडेचारशे कोटी महसूल प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती.  मात्र, मुदतवाढ देऊनही भूधारकांनी पाठ फिरविली.  त्यामुळे जेमतेम १०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर समाधान मानावे लागले. 

भूखंडाचा भाडेकरार झाल्यानंतर चार वर्षात विकास करणे बंधनकारक आहे. शुल्क भरून मुदतवाढीची तरतूद आहे. त्यासाठी अभय योजना राबवली. मात्र त्यालाही भूधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भूखंड रद्दचा निर्णय घेतला आहे. - विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक सिडको 

टॅग्स :cidcoसिडको लॉटरीNavi Mumbaiनवी मुंबई