शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोची कामोठेत कारवाई, अनधिकृत फेरीवाल्यांची बाजारपेठ उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:17 IST

पनवेल : कामोठेमधील सिडकोच्या भूखंडावर बेकायदा अतिक्र मण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत भाजी व मच्छी बाजारावर सिडकोने बुधवारी बुलडोझर फिरवत सर्व दुकाने जमीनदोस्त केली.

पनवेल : कामोठेमधील सिडकोच्या भूखंडावर बेकायदा अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत भाजी व मच्छी बाजारावर सिडकोने बुधवारी बुलडोझर फिरवत सर्व दुकाने जमीनदोस्त केली. या कारवाईदरम्यान कोणताही विरोध होऊ नये म्हणून सिडकोकडून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. सिडकोच्या अनधिकृत बांधकामाविरोधात विभागाच्या सततच्या कारवाईने अनधिकृत बाजार चालविणा-या राजकीय नेत्यांची भंबेरी उडाली आहे. पनवेल महानगरपालिकेने पालिकेत समाविष्ट केलेल्या सिडकोच्या मालकीचे भूखंड मोकळे करून देण्याचा निर्णय घेतल्याने सिडको अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे. या धडक कारवाईत अनधिकृत मंदिरेही जमीनदोस्त झाली. त्याप्रमाणे सिडकोने कारवाई सुरूच ठेवत आपल्या मालकीच्या कामोठे पोलीस स्टेशनजवळील सेक्टर ११, २१ व रेल्वे स्थानकाजवळील भूखंडावर अनधिकृतपणे उभी केलेल्या भाजी, मच्छी व शेकडो दुकानांवर कारवाई करताना संपूर्ण बाजारच जमीनदोस्त केला. व्यापाºयाकडून पुनर्वसनाची मागणी करण्यात येत होती. मात्र, येथील बाजार काही राजकीय व्यक्तींकडून आर्थिक व्यवहार होऊन चालविण्यात येत असल्याने सिडको अधिकाºयांनी सर्व दुकाने जमीनदोस्त केली.या कारवाईत सिडकोच्या वतीने अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील, नियंत्रक अधिकारी दीपक जोगी, सहायक नियंत्रक अधिकारी एस. आर. राठोड, कार्यकारी अभियंता ए. बी. रसाळ, बीट अधिकारी सुनील कर्पे, बी. झेड. नामवाड, आर. एस. चव्हाण, सहायक नियंत्रक अमोल चव्हाण, सुरक्षा अधिकारी सुरवटे, गोसावी, कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईक उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई