शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

सिडकोचे नो ड्यूज प्रमाणपत्र नियमबाह्य; राज्य सरकारचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:23 IST

बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक

नवी मुंबई :  बांधकाम परवानगी किंवा भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी महापालिका विकासकांकडून घेत असलेले  सिडकोचे नो ड्यूज सर्टिफिकेट राज्य सरकारने नियमबाह्य ठरविले आहे. त्याऐवजी नियमानुसार संबंधित अर्जदाराला सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक असल्याचे  राज्याच्या नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे नो ड्यूज, की ना हरकत यासंदर्भात विकासकांत  निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. 

नवी मुंबईतील संपूर्ण जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. सिडकोने खासगी विकासकांना भाडेपट्ट्यावर भूखंड दिले आहेत. यावर बांधकाम करण्यासाठी स्थानिक नियोजन प्राधिकरण या नात्याने महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानी घेणे आवश्यक आहे. १६ डिसेंबर १९९४ रोजीच्या शासन निर्णयानुसार पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी सिडकोचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु सिडकोकडून विकासकांना ना हरकत प्रमाणपत्राऐवजी नो ड्यूज सर्टिफिकेट अर्थात ना देय प्रमाणपत्र दिले जात आहे. नो ड्यूज सर्टिफिकेट हेच ना हरकत प्रमाणपत्र असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे विकासकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मात्र शासन निर्णयानुसार महापालिका आणि सिडकोची ही कृती  नियमबाह्य असल्याचा दावा माहिती कार्यकर्ते नरेंद्र हडकर यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली होती. बांधकाम परवानगी देताना महापालिकेच्या नगररचना विभागाकडून शासकीय नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे सिडकोच्या भूखंडांवर उभ्या राहिलेल्या सर्व इमारती तांत्रिकदृष्ट्या आपोआपच अनधिकृत ठरत असल्याचा दावा करीत हडकर यांनी राज्य सरकारकडे याप्रकरणी दाद मागितली होती.  मागील सहा वर्षांपासून त्यांचा यासंदर्भात  पाठपुरावा सुरू होता. 

पनवेल पालिकेतही अंमलबजावणी करावीदरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर नगरविकास विभागाने  अलीकडेच सिडकोला उपरोक्त निर्देश दिले आहेत. त्यानुसार  राज्य सरकारच्या १६ डिसेंबर १९९४ रोजीच्या निर्णयानुसार सिडकोने ना हरकत प्रमाणपत्राचा सर्वसमावेशक नमुना तयार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे सुचित केले आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेसह शेजारच्या पनवेल महापालिकेलासुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे मागील अनेक वर्षे नो ड्यूज की ना हरकत या संभ्रमात असलेल्या विकासकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :cidcoसिडको