शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये सिडकोच्या नैना प्राधिकरणाची अनाधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2023 16:56 IST

नैना प्राधिकरणाचे अनाधिकृत पथकाचे प्रताप नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

उरण : विंधणे आणि कंठवली येथील सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या हद्दीत खाडी किनारी सीआरझेडचे उल्लंघन करून खासगी विकासकांनी अनाधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारींनंतर सिडकोने सोमवारी (१५) बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करीत बुलडोझर फिरवला आहे. नैना प्राधिकरणाचे अनाधिकृत पथकाचे प्रताप नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

उरण तालुक्यातील विंधणे आणि कंठवली येथील  हद्दीतील सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या हद्दीत  खाडीकिनारी सीआरझेडचे उल्लंघन करून सर्व्हे नंबर १९८ -१ व २ आणि  इतर  जमिनीवर किसन राठोड आणि इतर विकासकांनी अनेक बेकायदेशीर बांधकामे केली आहेत.जमिनीचे दलाल आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पुढाऱ्यांना हाताशी धरून विकासकांकडून बेकायदेशीररित्या इमारती, बंगले गोदामे उभारण्याचा धडाका लावला आहे.

उरण परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामे करून सर्वसामान्यांना सि-लिंक, विमानतळालगत  स्वस्तात प्लॅट, बंगला,गोदाम,जागा मिळवून देतो अशा जाहिराती करून अनेक व्यावसायिक घराची गरज असलेल्यांकडून प्लॅटची बुकींग करून घेत आहेत.  घरांसाठी हजार लोकांची बुकींग घेवून विकासक, व्यावसायीक सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करत आहेत. कुठेतरी डोंगर कपारीत, दलदलीत, कांदळवन क्षेत्रातील किंवा खारफुटीने वेढलेल्या जागेचा सातबारा दाखवून ते या ग्राहकांना फसवतात. घरांची खोटी स्वप्न दाखवितात. घरांची खोटी स्वप्न दाखवणाऱ्या व त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या परिसरातील अशा अनेक विकासक आणि बेकायदेशीर बांधकामांविरोधात येथील शेतकरी, नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

या तक्रारींची दखल घेऊन सिडकोच्या नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाने सोमवारी (१५) पुन्हा एकदा पोलीस फाट्यासह तोडक कारवाई केली. यामध्ये काही पक्की बांधकामे बुलडोझर लावून उद्ध्वस्त केली आहेत.कारवाईच्या ठिकाणी लग्नमंडप असल्याने कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याची माहिती सिडकोच्या नैना प्राधिकरणाची अनाधिकृत बांधकाम विभागाचे पथक प्रमुख प्रताप नलावडे यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई