शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या माहिती अधिकाºयाला दंड, भूखंडवाटपाची माहिती दडपल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:29 IST

साडेबारा टक्के अंतर्गत वाटप झालेल्या भूखंडाची माहिती दडपल्या प्रकरणी सिडकोचे जन माहिती अधिकारी सुनील तांबे यांना राज्य माहिती आयुक्तांनी दंड सुनावला आहे.

नवी मुंबई : साडेबारा टक्के अंतर्गत वाटप झालेल्या भूखंडाची माहिती दडपल्या प्रकरणी सिडकोचे जन माहिती अधिकारी सुनील तांबे यांना राज्य माहिती आयुक्तांनी दंड सुनावला आहे. तक्रारदाराने माहिती अधिकारात माहिती मागूनही मागील दोन वर्षांपासून त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ होत होती. शिवाय सुनावनीलाही अनुपस्थित राहून शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.करावे येथील सम्राट रामचंद्र पाटील यांच्या आईच्या नावे मिळणारे साडेबारा टक्केअंतर्गतचे भूखंड वेगळ्याच व्यक्तीच्या नावे वाटप झाले आहेत. या प्रकारातून कोट्यवधी रुपयांचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न झालेला होता. त्यामुळे ही बाब त्यांनी सिडको अधिकाºयांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे २०१६ साली त्यांनी माहिती अधिकारातून सिडकोकडे सदर भूखंड वाटपाची माहिती मागितली होती. यानंतरही त्यांना ती देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे सम्राट पाटील यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या कोकण खंडपीठाकडे सिडकोचे जन माहिती अधिकारी सुनील तांबे यांच्याविरोधात तक्रार केलेली. त्यानुसार माहिती आयुक्त कार्यालयात ८ जानेवारी झालेल्या सुनावणीत तांबे यांनी माहिती नाकारण्याचा कारणाचा खुलासा केला होता. तो कोकण खंडपीठाने अमान्य करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिवाय २५ हजार रुपयांचा दंड देखील सुनावला आहे. दंडाची ही रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल केली जाणार आहे. माहिती अधिकार आयुक्तांच्या या कारवाईबाबत तक्रारदार सम्राट पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे; परंतु त्यानंतरही सिडकोकडून अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मूळ भूधारकाऐवजी त्रयस्थ व्यक्तीला साडेबारा टक्केच्या भूखंडाचे झालेले वाटप चुकीचे असतानाही त्यावर पडदा टाकला जात आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश देऊनही सिडको दखल घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.सिडकोच्या साडेबारा टक्के विभागातील कामकाजाबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. अशाच प्रकारातून सुनील तांबे यांची दक्षता विभागामार्फत चौकशीही सुरू होती. अनेक वर्षे ते या विभागात ठाम मांडून बसले होते. त्यानुसार चौकशीअंती त्यांची साडेबारा टक्के विभागातून दोन महिन्यांपूर्वी बदली करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको