शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळबाधितांच्या आंदोलनाकडे सिडकोची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 22:43 IST

विमानतळबाधित क्षेत्रात पुनर्वसनाच्या लाभासाठी संघर्ष करणारी अशी सुमारे १२०० कुटुंब असून, आपल्या न्याय मागण्यांसाठी या ग्रामस्थांनी सिडकोभवनसमोर गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू केले आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळामुळे बाधित होणाऱ्या दहा गावांचे सिडकोने भरीव पॅकेज देऊन पुनर्वसन केले आहे. मात्र, या परिसरात पिढ्यान्पिढ्या राहणाºया वंचित घटकांना त्यातून वगळण्यात आले आहे. विमानतळबाधित क्षेत्रात पुनर्वसनाच्या लाभासाठी संघर्ष करणारी अशी सुमारे १२०० कुटुंब असून, आपल्या न्याय मागण्यांसाठी या ग्रामस्थांनी सिडकोभवनसमोर गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाकडे सिडकोने पाठ फिरविल्याने या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.सिडकोच्या माध्यमातून विमानतळ प्रकल्पासाठी दहा गावे विस्थापित करण्यात आली आहेत. त्यासाठी सर्वेक्षण करून पात्र भूधारकांना पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. मात्र, याच परिसरात राहणाºया अनुसूचित जमाती आणि मच्छीमारांना वाºयावर सोडण्यात आले आहे. त्यांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना पुनर्वसन पॅकेजचा कोणताही लाभ मिळणार नाही. यासंदर्भात शेतकरी प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. आपल्या मागण्यांसाठी सिडकोला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या ग्रामस्थांनी १७ फेब्रुवारीपासून सिडको भवनसमोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोनलाची सिडकोच्या संबंधित विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याने आंदोलकांनी संपात व्यक्त केला आहे.विशेष म्हणजे, कोणताही मोठा प्रकल्प उभारताना संबंधित विभागाचा सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट तयार करणे गरजेचे आहे. विमानतळ प्रकल्पात अशा प्रकारचा कोणताही सर्व्हे झालेला नाही, असा आरोप शेतकरी प्रबोधिनीचे राजाराम पाटील यांनी केला आहे. विमानतळबाधित क्षेत्रातील १२०० ते १३०० घरांचा राहून गेलेला सर्व्हे करून त्यांचेही पुनर्वसन करावे, मच्छीमारांचे पुनर्वसन करावे आणि वाघिवली वाडा येथील पुरातन बौद्ध लेण्यांचे सवंर्धन करावे आदी प्रमुख मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा राजाराम पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :cidcoसिडको