शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना पुन्हा बसली खीळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:41 IST

कोरोनाचा फटका : दीड महिन्यात हजारो मजुरांचे स्थलांतर

- कमलाकर कांबळेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. परिणामी, मागील दीड महिन्यात हजारो मजुरांनी स्थलांतर केले आहे. मजूर नसल्याने सुरू असलेली विकासकामेही ठप्प पडली आहेत. याचा सर्वाधिक फटका सिडको महामंडळाला बसला आहे.

सिडकोच्या माध्यमातून मेट्रो, अंतरराष्ट्रीय विमानतळ, जलवाहतूक आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू आहेत; परंतु मजुरांअभावी मागील दीड महिन्यापासून हे सर्व प्रकल्प ठप्प पडले आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिली लाट आली. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ताळेबंदी घोषित करण्यात आली. या ताळेबंदीमुळे अनेक उद्योग बंद पडले. अनेकांच्या नोकरीवर गदा आली. कष्टकऱ्यांचा रोजगार हिरावला. त्यामुळे मजुरांनी मोठ्या प्रमाणात मूळ गावी स्थलांतर केले. मजुरांच्या स्थलांतराचा थेट फटका विकास प्रकल्पांना बसला. याची सर्वाधिक झळ सिडकोला बसली आहे. सिडकोच्या माध्यमातून सध्या आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मेगागृह प्रकल्पाची कामे सुरू आहेत. गेल्या वर्षी मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्य सरकाने विविध टप्प्यांत ठप्प पडलेल्या विकासकामांना गती देण्याच्या सूचना संबंधित प्राधिकरणांना दिल्या होत्या. त्यानुसार सिडकोने पहिल्या टप्प्यात रखडलेला मेट्रो प्रकल्प, वॉटर ट्रान्स्पोर्ट आणि आवास योजनेच्या कामाला गती दिली होती. ही कामे अंतिम टप्यात आली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तोंड वर काढले. त्यामुळे ताळेबंदींच्या भीतीने अनेक मजुरांनी स्थलांतर केले. परिणामी, हे प्रकल्प पुन्हा रखडले आहेत.

कोरोनामुळे गेल्या वर्षी सिडकोचे आर्थिक नियोजन फसले. त्यामुळे सिडकोची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी आर्थिक नियोजनावर भर दिला. उत्पन्नवाढीबरोबरच रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली. सिडकोची रिक्त झालेली तिजोरी भरण्यासाठी भूखंड विक्रीवर भर दिला, तसेच सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनेसुद्धा सकारात्मक प्रयास केले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत.

६० हजार कोटींच्या प्रकल्पांची रखडपट्टीnनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, पंतप्रधान आवास योजना, नैना प्रकल्प, खारघर कार्पोरेट पार्क, खारघर ते उलवे सागरी मार्ग, ऐरोसिटी प्रकल्प, नवी मुंबई- मुंबई जल वाहतूक, कोंढाणे धरणाची उभारणी, हेटवणे पाणीपुरवठा योजना आदी सुमारे ६० हजार कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प सिडकोने हाती घेतले आहेत. nमिशन बिगिन अगेनअंतर्गत यापैकी काही प्रकल्पांना युद्धपातळीवर चालना देण्यात आली; परंतु मजुरांनी स्थलांतर केल्याने या कामांना पुन्हा खीळ बसली आहे.

ताळेबंदीच्या भीतीने मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. त्याचा मोठा फटका सिडकोच्या विकासकामांना बसला आहे. विशेषत: मेट्रो आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या गृहप्रकल्पांना याची सर्वाधिक झळ बसली आहे. मजुरांअभावी ही कामे रखडली आहेत.    -डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको