शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धापन दिनानिमित्त थकीत सेवा शुल्क वसुलीसाठी सिडकोची अभय योजना, ...तर ५० टक्के सूट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 08:13 IST

सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रात विविध सुविधांची पूर्तता केली आहे. विशेषत: रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, पथदिवे आदी नागरी सुविधांचा यात समावेश आहे.

नवी मुंबई :  वर्धापन दिनाचे औचित्य साधून सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रातील थकीत सेवा शुल्कवसुलीसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ही अभय योजना  पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. या कालावधीत सेवा शुल्क भरणाऱ्यांना विलंब शुल्कामध्ये सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे  विलंब शुल्क वगळता ज्यांचे सेवा शुल्क एक  कोटीपेक्षा कमी आहे, अशा थकबाकीदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रात विविध सुविधांची पूर्तता केली आहे. विशेषत: रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, पथदिवे आदी नागरी सुविधांचा यात समावेश आहे.  या सुविधांच्या बदल्यात सिडकोकडून भूखंडांचे लीज होल्डर, सहकारी गृहनिर्माण संस्था, बांधकामधारक आदींकडून  दर तीन महिन्यांनी सेवा शुल्क आकारले जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे १ एप्रिलला सेवा शुल्क आगाऊ भरणे बंधनकारक असते. तसेच यासंदर्भात महामंडळाकडून सेवा शुल्काच्या वसुलीसाठी दर महिन्याला देयके पाठवली जातात. मात्र वारंवार नोटीस बजावूनही अनेकांनी मोठ्या प्रमाणात  सेवा शुल्क थकविल्याचे समोर आले आहे. मागील एक वर्षापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.  त्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ताळेबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. परिणामी अनेकांना इच्छा असूनही सेवा शुल्काचा भरणा करता आलेला नाही. 

या सर्व गोष्टींचा विचार करून थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी ही अभय योजना आणल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य थकबाकीदारांना दिलासा देणारी ही योजना आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले आहे. सिडकोच्या या योजनेमुळे थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे. 

...तर ५० टक्के सूट अभय योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत सेवा शुल्क भरणाऱ्या थकबाकीदारांना ७५ टक्के विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. तर त्यानंतर परंतु बारा महिन्यांच्या आता सेवा शुल्क भरणाऱ्यांना विलंब शुल्कामध्ये ५० टक्के सूट दिली जाणार आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबईTaxकर