शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

सिडकोत घाऊक बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:28 IST

१३ अधिकाऱ्यांच्या बदल्या : प्रशासकीय कारणास्तव व्यवस्थापनाचा निर्णय

नवी मुंबई : सिडको व्यवस्थापनाने लक्षणीय खांदेपाटल केले आहेत. त्यानुसार विविध विभागात कार्यरत असलेल्या १३ अधिकाऱ्यांच्या विभागीय बदल्या करण्यात आल्या आहेत. पणन-२ विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांची शहर सेवा (१) चे व्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर या विभागाच्या विद्यमान व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांची पनवेल विभागीय कार्यालयात बदली केली आहे.

सिडकोच्या कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे सिडकोतील संभाव्य बदल्यासंदर्भात लोकमतने सविस्तर वृत्त दिले होते. लोकमतचे हे वृत्त खरे ठरले आहे. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांनी मंगळवारी १३ अधिकाºयांच्या बदलीचे आदेश जारी केले. यात डावरे आणि बिडवे यांच्यासह कार्मिक विभागाचे (२) व्यवस्थापक भरत ठाकूर, अनधिकृत बांधकाम नियंत्रक (नैना) एस. आर. राठोड व पणन (१) विभागाचे व्यवस्थापक अमित शिंदे, कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका विद्या तांबवे, सामाजिक सेवा अधिकारी प्रशांत भंगारे, शहर सेवा (३) व्यवस्थापक आर. बी. टकले, अतिरिक्त भूख्य भूमी व भूमापन अधिकारी (विमानतळ) पी. बी. साबळे, शहर व्यवस्थापक (१) एम. के. कोळी, अनधिकृत बांधकाम विभागाच्या सहा. नियंत्रक श्वेता वाडेकर व सह पणन अधिकारी अमित राजपूत या वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश आहे.

भरत ठाकूर यांच्यावर मुख्य प्रशासक (नवीन शहरे) म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर ठाकूर यांच्या रिक्त झालेल्या कार्मिक विभागाच्या व्यवस्थापक पदावर एस.आर. राठोड यांची बदली करण्यात आली आहे. डी. एस. चौरे यांची सिडकोच्या वाशी विभागीय कार्यालयात बदली करण्यात आली आहे. कार्मिक विभागाच्या विद्या तांबवे यांची बदली सिडकोच्या खारघर कार्यालयत करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त झालेल्या कार्मिक विभागाच्या व्यवस्थापक पदावर समाजसेवा अधिकारी प्रशांत भंगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दोन अधिकाºयांवर अतिरिक्त कार्यभारच्उपजिल्हाधिकारी तथा शहर सेवा (३) विभागाचे व्यवस्थापक अशोक मुंडे आणि शहर सेवा (१) विभागाचे व्यवस्थापक फैयाज खान यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यानुसार मुंडे यांच्यावर सिडकोच्या ऐरोली विभागीय कार्यालयाचा तर फैयाज खान यांच्यावर शहर सेवा (३) विभागाच्या सह व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.च्गेल्या वर्षी सिडकोने काढलेल्या मेगागृह योजनेच्या सोडत प्रक्रियेचे काम पणन (२) विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या या विभागाचे व्यवस्थापक म्हणून लक्ष्मीकांत डावरे हे काम पाहत आहेत. या पदावरून त्यांची बदली करण्यात आली असली तरी गृहनिर्माण योजनेतील सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते नवीन पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे या बदली आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.