शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोकडून कामगारांना मिळणार ४ कोटींचा बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 04:44 IST

आझाद कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश

कळंबोली : पूर्वी सिडकोमध्ये कार्यरत असलेले मात्र गेल्या पंधरा महिन्यांपासून पनवेल महानगरपालिकेकडे काम करणाºया साडेपाचशे सफाई कामगारांना सिडकोकडून थकीत बोनस देण्यात येणार आहे. आझाद कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, लवकरच कामगारांच्या खात्यावर चार कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पनवेल महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन आणि त्याअगोदर साफसफाईच्या कामाच्या सेवा हस्तांतरित करून घेतल्या आहेत. नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा आणि नावडे येथील वसाहतींमध्ये सिडको प्राधिकरण या सेवा देत होते. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार काम करत होते. हे कामगार सेवा हस्तांतरणानंतर पनवेल पालिकेकडे वर्ग करण्यात आले. मनपाने नियमित कामावर येणाºया कामगारांना महापालिकेत कंत्राटी पद्धतीने घेतले. साई गणेश या ठेकेदाराच्या अंतर्गत हे सफाई कामगार काम करत आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून महादेव वाघमारे हे लढा देत आहेत.

गेल्या पंधरा महिन्यापासूनच्या पगारी सुट्या, तसेच करारनामामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर सुविधा सफाई कामगारांना मिळाव्यात यासाठी लढा सुरू आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही याविषयी याचिका दाखल केली आहे. परंतु त्या अगोदर सिडकोने कामगारांना बोनस दिला नव्हता. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आझाद कामगार कामगार संघटनेचा सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता. तसेच आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याची दखल घेत सिडकोने सफाई कामगारांचा थकित बोनस देण्याचे मान्य केले. त्यानुसार आरोग्य विभागाकडून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच कामगारांच्या खात्यावर बोनसची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

सफाई कामगारांना सिडकोकडे असलेली बोनसची रक्कम लवकरात लवकर दिली जाणार आहे. त्याकरिता बँक खाते आणि इतर माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सिडको कामगारांचे पैसे देणार असल्याची भूमिका सुरुवातीपासून आहे.- डॉ. बी. एस. बावस्कर,मुख्य आरोग्य अधिकारी, सिडको

महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे विलंब

पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या कंत्राटी पद्धतीने काम करणाºया सफाई कामगारांचा बोनस सिडकोकडे थकीत होता. ही रक्कम मिळावी यासाठी आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून महादेव वाघमारे यांनी लढा उभारला. त्यानुसार सिडकोने पनवेल महानगरपालिकेकडून सफाई कामगारांच्या बँक खात्याची माहिती मागवली होती. त्यामध्ये बोनसची रक्कम वर्ग करण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु मनपाने ही माहिती दडवून ठेवली आणि ती सिडकोला दिली नाही. त्यामुळे बोनसचे पैसे देण्यास विलंब झाला असल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई