शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने कसली कंबर

By कमलाकर कांबळे | Updated: February 5, 2024 21:05 IST

संचालन, देखभालीसाठी खासगी संस्थेचा शोध

नवी मुंबई : मेट्रो सेवा सुरू केल्यानंतर सिडकोने आता नेरूळ जेट्टी ते मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हलचाली सुरू केल्या आहेत. खासगी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी इच्छुक संस्थेकडून प्रस्ताव मागविले आहेत. पुढील दोन महिन्यात ही सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना असल्याची माहिती सूत्राने दिली.

मुंबई ते नवी मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने नेरूळ येथे सुमारे १११ कोटी रुपये खर्चून सुसज्ज जेट्टी बांधली आहे. परंतु, मागील दोन वर्षांपासून ही जेट्टी धूळखात पडली आहे. वापर नसल्याने तिच्या देखभालीवर सिडकोला लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.एप्रिल २०१८ मध्ये या जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली होती.

विशेष म्हणजे हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनाचा संसर्ग आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम काही प्रमाणात रखडले होते. परंतु, सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी कोरोनाच्या प्रतिकूल काळातही सप्टेंबर २०२१ मध्ये या जेट्टीचे काम पूर्ण करून घेतले. तेव्हापासून विविध कारणांमुळे ही जेट्टी वापराविना पडून आहे. ही बाब लक्षात घेऊन सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दीर्घकाळ रखडलेली जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नेरूळ जेट्टीचे संचलन, देखभाल, पर्यटनासह पर्यटन सुविधा देण्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत. विशेष म्हणजे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दीर्घकाळ रखडलेल्या मेट्रोचे लोकार्पण करून नवी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. त्याच धर्तीवर पुढील दोन तीन महिन्यात नवी मुंबई ते मुंबईदरम्यान नेरूळ जेट्टीवरून जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी कंबर कसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

बेलापूर जेट्टीवरून प्रवास महागडाबेलापूर येथे मेरिटाईम बाेर्डाने जेट्टी बांधली आहे. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी या जेट्टीवरून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. परंतु, त्याचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूर ते मुंबईदरम्यानचे तिकीट दर कमी करावेत, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने जलवाहतूक सेवा सुरू करताना तिकीट दर कमी ठेवावेत, अशी मागणी आतापासूनच नवी मुंबईकरांकडून केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई