शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

इमारतींचे ७०० स्लॅब ५५५ दिवसांत पूर्ण करण्याचा सिडकोचा विक्रम, गृहनिर्माण क्षेत्रात घोडदौड

By कमलाकर कांबळे | Updated: November 8, 2022 08:19 IST

मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृह बांधणी क्षेत्रात नवीन विक्रम करणाऱ्या सिडकोने आता ७०० स्लॅबचे काम अवघ्या ५५५ दिवसांत पूर्ण करून आपलाच विक्रम मोडला आहे. 

नवी मुंबई :

मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृह बांधणी क्षेत्रात नवीन विक्रम करणाऱ्या सिडकोने आता ७०० स्लॅबचे काम अवघ्या ५५५ दिवसांत पूर्ण करून आपलाच विक्रम मोडला आहे. 

स्लॅब टाकण्याचा दिवसाचा  सरासरी वेग १.२६ इतका आहे. त्यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम  पूर्ण केले होते. सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजनेंतर्गत विविध टप्प्यांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या योजनेतील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल  आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे घरांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्यावर सिडकोचा भर आहे. 

1. यापूर्वी मिशन- ९६ अंतर्गत प्रिकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बामणडोंगरी स्थानकाच्या परिसरात  केवळ ९६ दिवसांत ९६ सदनिकांचा समावेश असलेल्या १२ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. 2. याच तंत्रज्ञानाचा वापर करून सिडकोने तळोजा सेक्टर २८, २९, ३१ आणि ३७ मध्ये उभारण्यात येत असलेल्या इमारतींच्या ५०० स्लॅबचे काम अवघ्या ४८९ दिवसांत पूर्ण केले. त्यानंतर आता  याच विभागात ५५५ दिवसांत ७०० स्लॅबचे काम पूर्ण केले आहे.  3. प्रगत  तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करता सिडकोने हे काम पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोचे वास्तुशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभियंते आणि प्रकल्प सल्लागारांसह इतर संबंधित घटकांचे  अभिनंदन केले आहे.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्याचे सिडकोचे  उद्दिष्ट आहे. हे करीत असताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. घरांचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न वेळेत आणि निर्धारित कालावधीत पूर्ण होण्यास मदत होईल.- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :cidcoसिडको