शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची विक्रमी घोडदौड सुरूच; ७०० स्लॅबचे काम ५५५ दिवसांत केले पूर्ण

By कमलाकर कांबळे | Updated: November 7, 2022 17:58 IST

ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम  पूर्ण केले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई: मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृहबांधणी क्षेत्रात नवीन विक्रम करणाऱ्या सिडकोने आता ७०० स्लॅबचे काम अवघ्या ५५५ दिवसांत पूर्ण करून आपल्याच विक्रमाची पुनर्रावृत्ती केली आहे. स्लॅब टाकण्याचा दिवसाचा  सरासरी वेग १.२६ इतका आहे. त्यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम  पूर्ण केले होते. 

सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजनेंतर्गत  विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत.  या योजनेतील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे घरांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्यावर सिडकोचा भर आहे. यापूर्वी मिशन- ९६ अंतर्गत प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सिडकोने बामणडोंगरी स्थानकाच्या परिसरात  केवळ ९६ दिवसांत ९६ सदनिकांचा समावेश असलेल्या १२ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. सिडकोने केलेल्या या कामाचे जगभरातून कौतूक झाले होते. त्यानंतर प्रीकास्ट याच तंत्रज्ञानाचा वापर करीत सिडकोने तळोजा सेक्टर २८, २९, ३१ आणि ३७ मध्ये उभारण्यात येत असलेल्या इमारतींच्या ५०० स्लॅबचे काम अवघ्या ४८९ दिवसांत पूर्ण करून गृहनिर्माण क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व सिध्द केले आहे.

त्यानंतर आता  याच विभागात ५५५ दिवसांत ७०० स्लॅबचे काम पूर्ण केले आहे. प्रगत  तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामच्या दर्जाशी कोणतही तडजोड न करता सिडकोने हे काम पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोचे वास्तुशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभियंते आणि प्रकल्प सल्लागारांसह इतर संबधित घटकांचे  अभिनंदन केले आहे.

दरम्यान, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. हे करीत असताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. घरांचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी बांधकाम  क्षेत्रातील प्रगत  व अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको