शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उरण उपजिल्हा रुग्णालयासाठी सिडकोने भरले साडेसात लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 03:05 IST

विलंब शुल्काचा भरणा; डॉ. संजय मुखर्जी यांनी टि्वटरवरून दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क उरण : उरण तालुक्यातील मागील सात वर्षांपासून रखडलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या विलंब शुल्काची ७ लाख ५१ हजार ४६ रुपयांची रक्कम सिडकोने भरल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी रविवारी टि्वटरवरून दिली आहे.उरण येथे प्रस्तावित १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोने ५९८३.७९ चौरस मीटर जागा दिली आहे.उरण येथील बोकडवीरा - फुंडे गावादरम्यान असलेल्या सिडकोच्या मालकीच्या सेक्टर १५-(अ)मध्ये दिलेल्या जागेची सुमारे ८० लाख रुपये किंमत लावण्यात आली आहे. यापैकी बहुतांश किंमत अदा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम शासनाकडून मुदतीत भरण्यात आलेली नाही. या विलंबामुळे सिडकोने रकमेवर विलंब शुल्काची आकारणी केली आहे. भुखंडाची उर्वरित रक्कम विलंब शुल्कासह भरण्याची मागणी सिडकोने केली आहे. यावर उर्वरित रकमेसह विलंब शुल्काची रक्कम सिडकोने माफ करण्याची मागणी राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती, अशी माहिती रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने यांनी दिली.राज्याच्या आरोग्य विभागाच्या मागणीची दखल घेऊन सिडको अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी विलंब शुल्काची रक्कम ७ लाख ५१ हजार ४६ रुपयांची रक्कम सिडकोने भरणा केली असल्याची माहिती मुखर्जी यांनी रविवारी टि्वटरवरून दिली आहे.निधीअभावी सात वर्षांपासून काम रखडले  निधीअभावी मागील सात वर्षांपासून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे काम रखडले आहे. १०५ कोटी खर्चाच्या या प्रस्तावित रुग्णालयासाठी उरण परिसरात असलेल्या शासकीय जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, सिडको आदी प्रकल्प आणि कंपन्यांकडून निधी उभारण्याच्या सुचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. निधीअभावी मागील सात वर्षांपासून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे काम रखडले आहे. १०५ कोटी खर्चाच्या या प्रस्तावित रुग्णालयासाठी उरण परिसरात असलेल्या शासकीय जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, सिडको आदी प्रकल्प आणि कंपन्यांकडून निधी उभारण्याच्या सुचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :cidcoसिडको