शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

निवासी नळजोडणी धारकांसाठी सिडकोने आणली अभय योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 23:41 IST

थकीत बिले वसूल करणार : विलंब शुल्क वगळून चार हप्ते

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : साडेबारा टक्के भूखंडांवर उभारलेल्या निवासी इमारतीतील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात पाणी देयके थकली आहेत. ही थकीत बिले  वसूल करण्यासाठी सिडकोने अभय योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित नळजोडणीधारकाला विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. १ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीसाठी ही योजना कार्यरत असणार आहे. 

पनवेल महापालिका क्षेत्र आणि सिडको कार्यक्षेत्रात साडेबारा टक्के भूखंडावर मोठ्या प्रमाणात निवासी इमारती उभारल्या आहेत. नियमानुसार या भूखंडांवर १५ टक्के वाणिज्यिक तर ८५ टक्के क्षेत्राचा निवासी वापर करता येतो. परंतु अनेक भूखंडधारकांनी या नियमाला हरताळ फासला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा शेकडो गृहनिर्माण संस्थांना संबंधित प्राधिकरणांनी भोगवटा प्रमाणपत्र नाकारले आहे. याचा परिणाम म्हणून या  गृहनिर्माण संस्थांना  वाणिज्यिक दराने पाणी बिले भरावी लागत आहेत.  ही बिले भरमसाट असल्याने अनेकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. पाणी देयकाची ही थकीत वसुली करण्याच्या दृष्टीने सिडकोने राज्य सरकारच्या मान्यतेनंतर अभय योजना जाहीर केली आहे. 

 या योजनेचा लाभ घेणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी आपल्या एकूण थकबाकीची रक्कम विलंब शुल्क वगळून समान चार हप्त्यांत भरायची आहे. ही रकम भरल्यानंतर  भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित गृहनिर्माण संस्थेला सिडकोकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी थकबाकीची रक्कम भरल्यानंतर संबंधित गृहनिर्माण संस्थेने त्यासाठी चार महिन्यांच्या आत सिडकोकडे अर्ज करणे अनिवार्य असणार आहे. 

एक वर्षाची कालमर्यादाभोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडे सादर केल्यानंतर संबंधित गृहनिर्माण संस्थेला निवासी दराने पाणी दर लागू केला जाणार आहे. भोगवटा प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत भोगवटा प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांकडून वाणिज्यिक दराने पाणी देयके वसूल केली जातील. त्यांना अभय योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.