शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर; विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा

By कमलाकर कांबळे | Updated: June 6, 2024 21:23 IST

नवी मुंबई : सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ती ७ जून रोजी जाहीर केली ...

नवी मुंबई : सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ती ७ जून रोजी जाहीर केली होती. त्यानुसार संबंधित विभागाने तयारीही केली होती. मात्र, ३१ मेपासून विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता घरांची सोडत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सिडकोने आपल्या पोर्टलवर याबाबतची सूचनाही प्रसारित केली आहे. त्यामुळे या गृहयोजनेत अर्ज केलेल्या ग्राहकांना सोडतीसाठी आणखी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे. मात्र, विविध कारणांमुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. विशेष म्हणजे, यातील सर्वाधिक घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यापैकी ३,३२२ घरांची योजना प्रजासत्ताक दिनी जाहीर केली आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १६ एप्रिल होती. तर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार संगणकीय सोडतीसाठी १९ एप्रिलचा दिवस निश्चित केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १९ एप्रिलची पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलून ७ जूनचा मुहूर्त निश्चित केला.

आता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल केली असली तरी विधान परिषदेच्या कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता ५ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे घरांची संगणकीय सोडत त्यानंतरच म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.

- उपलब्ध घरांचा तपशीलविक्रीसाठी उपलब्ध केलेल्या ३,३२२ घरांपैकी द्रोणागिरी नोडमध्ये ६१ तर तळोजामध्ये २५१ अशा एकूण ३१२ सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. द्रोणागिरीतील ३७४ व तळोजा नोडमधील २,६३६ अशा एकूण ३,०१० सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत. यापैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या ३१२ सदनिकांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे; मात्र संबंधित विभागाच्या विविध प्रयत्नांनंतरही सर्वसाधारण घटकांसाठी असलेल्या ३,०१० सदनिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या घरांची विक्री करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले आहे.

टॅग्स :cidcoसिडको