शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

सिडकोची ३३२२ शिल्लक घरे विक्रीसाठी उपलब्ध; तळोजा, द्रोणागिरीतील सदनिकांचा समावेश

By कमलाकर कांबळे | Updated: January 27, 2024 20:13 IST

सिडकोच्या विविध गृहयोजनेतील हजारो घरे विक्रीविना पडून आहेत.

नवी मुंबई: सिडकोच्या विविध गृहयोजनेतील हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. विशेषत: तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये सर्वाधिक घरे शिल्लक आहेत. त्यापैकी सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ३३२२ घरांची नव्याने योजना जाहिर केली आहे. यात द्रोणागिरी नोडमध्ये ४३५ तर तळोजा नोडमध्ये २८८७ घरांचा समावेश आहे. या योजनेतील घरांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत २७ मार्चपर्यंत देण्यात आली आहे. सिडकोच्या माध्यमातून २०१८ ते २०२२ या पाच वर्षाच्या कालावधीत विविध नोडमध्ये विविध घटकांसाठी पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

त्यानुसार वेळोवेळी संगणकीय सोडत काढून काही प्रकल्पातील घरांचे वाटपही करण्यात आले आहे. मात्र तळोजा आणि द्रोणागिरी या दोन नोडमधील घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वाधिक घरे तळोजा नोडमध्ये बांधली आहे. तर आणखी काही घरांचे बांधकाम सुरू आहे. मात्र जुन्या प्रकल्पातीलच घरे विकली जात नसल्याने घरांची नवीन योजना जाहिर करण्यास सिडको धजावत नाही. असे असले तरी तळोजा आणि द्रोणागिरीमधील शिल्लक घरे विकण्यासाठी सिडकोने यापूर्वी सुध्दा अनेक योजना जाहिर केल्या आहेत. मात्र त्यानंतरही घरे शिल्लक राहिल्याने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ३३२२ घरांची योजना जाहिर केली आहे. या घरांसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ६ लाख तर सर्वसाधारण घटकासाठी सहा लाखा पेक्षा अधिक उत्पन्न मर्यादा निश्चीत करण्यात आली आहे. नव्या योजनेत उपलब्ध घरांचा तपशीलद्रोणागिरी नोडमध्ये एकूण ४३५ घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यापैकी ६१ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर ३७४ घरे सर्वसाधारण घटकांसाठी आहेत. त्याचप्रमाणे तळोजा नोडमध्ये एकूण २८८७ घरे आहेत. त्यातील २५१ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित २६३६ घरे सर्वसाधारण घटकांसाठी आरक्षित असणार आहेत. या योजनेतील घरांसाठी ऑनलाईन नोंदणी २६ मार्चपर्यंत करता येणार आहे. तर ३० जानेवारी ते २७ मार्च या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. या योजनेची संगणकीय सोडत १९ एप्रिल रोजी काढली जाणार असल्याचे सिडकोच्या संबधित विभागाने कळविले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको