शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोची आणखी १ लाख घरे; चार वर्षांत टप्प्याटप्प्याने करणार बांधकाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 02:40 IST

परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर सिडकोने सध्या ९0 हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : सर्वसामान्यांसाठी ९0 हजार घरांची घोषणा केल्यानंतर सिडकोने आता आणखी १ लाख १0 हजार घरे निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने या महागृहनिर्माण योजनेस शुक्रवारी मंजुरी दिल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर सिडकोने सध्या ९0 हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. बुधवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत या घरांच्या निर्मित्तीसाठी तब्बल १९ हजार कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर लगेच शुक्रवारी राज्य शासनाने आणखी १ लाख १0 हजार घरे बांधण्याचे निर्देश सिडकोला दिले आहेत. त्यानुसार पुढील चार वर्षांत सिडकोच्या माध्यमातून तब्बल दोन लाख घरांची निर्मित्ती केली जाणार आहे.सध्या ९0 हजार घरांच्या प्रकल्पावर सिडकाचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद झाली असून कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यावर सिडको १ लाख १0 हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधणार आहे. पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने दोन लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असे चंद्र यांनी स्पष्ट केले.९0 हजार घरांसाठी शहरातील रेल्वे स्थानकांचा फोर्ट कोर्ट एरिया, ट्रक टर्मिनल्स, बस डेपो आदी जागा निश्चित केल्या आहेत. मात्र नव्याने घोषणा झालेली घरे शहरातील पडीक व दुर्लक्षित भूखंडांवर बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यास सिडको कटिबद्ध आहे. त्यानुसार ९0 हजार घरांच्या निर्मित्तीला सुरुवात झाली आहे. आता यात आणखी १ लाख १0 घरांची भर पडणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरे असणार आहेत. राज्य सरकारने या गृहनिर्मितीला मंजुरी दिली आहे. - लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई