शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिडको इमारतींची दुरवस्था

By admin | Updated: July 7, 2016 03:06 IST

खांदा कॉलनीतील सिडकोच्या ए टाईप इमारतींची दुरवस्था झाली आहे. इमारती पूर्णत: मोडकळीस आल्याने येथील रहिवासी जीव मुठीत घेवून जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर

- वैभव गायकर,  पनवेल

खांदा कॉलनीतील सिडकोच्या ए टाईप इमारतींची दुरवस्था झाली आहे. इमारती पूर्णत: मोडकळीस आल्याने येथील रहिवासी जीव मुठीत घेवून जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर या इमारतींची पुनर्बांधणी कधी होणार, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. ए टाईपच्या येथील प्रभुकुंज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ९ क्रमांकाच्या खोलीचा रविवारी स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेनंतर येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडकोने १९९0 च्या सुमारास या परिसरात गजानन , विशाल , त्रिमूर्ती व प्रभुकुंज अशा ए टाईपच्या इमारती उभारल्या आहेत. या चारही इमारतीत जवळपास ३९६ सदनिका आहेत. यात बहुतांशी मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात. नोकरी आणि घर असे नित्याचे वेळापत्रक असलेल्या या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण इमारती पूर्णत: मोडकळीस आल्या असून राहण्यास धोकादायक बनल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने मुसळधार पावसामुळे या इमारतीमधील प्लास्टर निखळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घरांचे दर गगनाला भिडल्याने मोडकळीस आलेले हे घर सोडून अन्यत्र स्थलांतरितही होता येत नाही. अशा परिस्थितीत दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटही केले आहे. त्यानंतरही या इमारतींच्या पुनर्बांधणीकडे लक्ष दिले जात नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे. रविवारी प्रभुकुंज सोसायटीत घडलेल्या घटनेनंतर आम्ही त्वरित दुरु स्तीचे काम हाती घेतले आहे. या सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झालेले आहे. त्यांच्या पुनर्बांधणीचा निर्णय योजना विभागाचा आहे. - सुधाकर विसाळे, प्रशासकीय अधिकारी सिडकोमागील दहा वर्षांपासून या इमारतीच्या पुनर्बांधणीचा मुद्दा सिडको दरबारी मांडत आहोत. एखादा रहिवासी जीवानिशी गेल्यावर सिडकोला जाग येणार आहे का? त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे बनले आहे. - शिवाजी थोरवे, माजी नगरसेवक