शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सिडको भवनची सुरक्षा ऐरणीवर, मुख्यालयातच घरफोडी, सुरक्षा भेदून दुसऱ्यांदा चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:07 IST

सीबीडीमधील सिडको भवनमध्ये मंगळवारी रात्री घरफोडी झाली आहे. पोलीस आयुक्तालय व कोकण परिक्षेत्राच्या महासंचालकांच्या कार्यालयासमोर झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोन वर्षांमध्ये दुसºयांदा चोरीची घटना घडली असून सिडको भवनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई : सीबीडीमधील सिडको भवनमध्ये मंगळवारी रात्री घरफोडी झाली आहे. पोलीस आयुक्तालय व कोकण परिक्षेत्राच्या महासंचालकांच्या कार्यालयासमोर झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोन वर्षांमध्ये दुसºयांदा चोरीची घटना घडली असून सिडको भवनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. विमानतळासह अनेक भव्य प्रकल्प उभारणाºया सिडकोने दक्षिण नवी मुंबई परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तब्बल १०९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विकसित केलेल्या शहराची सुरक्षा करण्यासाठी भव्य योजना जाहीर करणाºया सिडकोला स्वत:च्या मुख्यालयाची सुरक्षा करण्यात अपयश येवू लागले आहे. सिडको भवनच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक बोर्ड व स्वत:चे सुरक्षा कर्मचारी आहेत. कार्यालयामध्ये येणाºया-जाणाºया प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते. रात्रीही बंदोबस्तासाठी सुरक्षारक्षक तैनात असतात. परंतु ही सर्व सुरक्षा व्यवस्था भेदून चोरट्यांनी मंगळवारी रात्री पाचव्या मजल्यावरील लेखा शाखेत घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी रोख रक्कम सापडली नाही, परंतु चोरट्यांनी कागदपत्रे हलवली होती. सकाळी कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याविषयी तत्काळ सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सिडको भवनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी बांबूंची परांची लावण्यात आली आहे. या परांचीवरून चोरटे आतमध्ये आले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सिडको भवनमध्ये घरफोडीचा प्रयत्न झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. चोरटे पाचव्या मजल्यावर पोहचलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.लेखा शाखेतील कागदपत्रे हलविण्यात आली होती. महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली असती किंवा फाईल गहाळ झाल्या असत्या तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चोरटे बरोबर पाचव्या मजल्यावरच कसे पोहचले असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी सिडकोमधील व परिसरातील सीसीटीव्ही पाहून गुन्ह्याचा तपास केला जात आहे. सिडको भवनमध्ये २४ तास सुरक्षारक्षक असताना चोरटे आतमध्ये गेलेच कसे असा प्रश्नही उपस्थित केला जात असून या प्रकरणाची कसूनचौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :cidcoसिडको