शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये आठ स्वच्छतादूतांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:29 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यभरातील महापालिकांनी वेगवेगळे स्वच्छतादूत नेमून नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. पनवेल महापालिकेनेही आठ स्वच्छतादूतांची निवड केली आहे.

पनवेल : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यभरातील महापालिकांनी वेगवेगळे स्वच्छतादूत नेमून नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. पनवेल महापालिकेनेही आठ स्वच्छतादूतांची निवड केली आहे. पालिकेने छाया तारलेकर, श्वेता क्रि ष्णन, सुधी किट्रो, डॉ. मंजुषा देशमुख, धनराज विसपुते, हरेश हरिदास, के. एम. वासुदेवन पिल्लई, एम. एन. राजू यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली आहे.महापालिका परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पनवेल पालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पनवेल महापालिकेला कलाकार भाऊ कदम व नेमबाज सुमा शिरूर यांच्या रूपाने सामाजिक भावनेतून मोफत काम करू इच्छणारे स्वच्छतादूत भेटले आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या विविध उपक्र मांत भाऊ कदम व सुमा शिरूर हजर राहून नागरिकांना प्रोत्साहन देणार आहेत.पनवेल महापालिकेद्वारे परिसरात स्वच्छता अभियानाचे काम सुरू आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध विभागात कार्य करीत आहेत. स्वच्छतेसाठी नागरिकांनीही एकत्र येऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. महापालिका हद्दीतील २० प्रभाग स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी स्पर्धा घेतली जात आहे. त्यानुसार प्रभागातील भिंती रंगविल्या जात आहेत, तर काही ठिकाणी सुविचार, सामाजिक संदेश देऊन स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी स्वत:च्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी व स्वच्छतेची गुणवत्ता टिकवावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर होण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आयुक्त सुधाकर शिंदे सांगत आहेत.स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने पुरेशा खतकुंड्या उभाराव्यात, नागरिकांकडून वेळच्या वेळी कचरा संकलन करावे, ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आठ स्वच्छतादूतांची निवड केली असली, तरी महापालिकेला आणखी स्वच्छतादूतांची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वच्छतादूत स्वच्छ व सुंदर पनवेलबाबत जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वच्छतादूतांना प्रयत्न करावे लागणार आहेत.>प्रशासनाचे प्रयत्नमहापालिकेद्वारे परिसरात स्वच्छता अभियानाचे काम सुरू आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध विभागात कार्य करत आहेत. स्वच्छतेसाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.>माझ्यावर सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडणार आहे. स्वच्छतादूत म्हणून महापालिकेला सहकार्य करणार आहे.- धनराज विसपुते,स्वच्छतादूत, पनवेल

टॅग्स :panvelपनवेल