शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत स्वीकृत सदस्यांची निवड

By admin | Updated: January 12, 2017 06:12 IST

नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या सभेत नाट्यमय घडामोडीनंतर, राष्ट्रवादीचे नितीन मोरे, शेकापचे निजामुद्दीन

 खोपोली : नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या सभेत नाट्यमय घडामोडीनंतर, राष्ट्रवादीचे नितीन मोरे, शेकापचे निजामुद्दीन जळगावकर व शिवसेनेचे अमोल जाधव यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सुमन औरसमल यांनी जाहीर केले. खोपोली नगरपरिषदेत शिवसेना १०, भाजपा ३ व काँग्रेस ३, असा १५ नगरसेवकांचा एक गट अस्तित्वात आला आहे. तर राष्ट्रवादी १०, शेकाप ३, अपक्ष १ व नगराध्यक्ष धरून १५ जणांचा दुसरा गट कार्यरत आहे. स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीच्या वेळी सेनेचे गटनेते सुनील पाटील यांनी अमोल जाधव शिवसेना व चंद्रभागा अनिवार भाजपा अशी दोन नावे दिली, तर राष्ट्रवादी गटाकडून नितीन मोरे राष्ट्रवादी व निजामुद्दीन शेकाप अशी नावे देण्यात आली. दोन्ही गटाकडून प्रत्येकी एक सदस्य निवडून आल्यानंतर तिसऱ्या पदासाठी चिठ्ठी टाक ली जाईल, अशी अपेक्षा असताना, सुमन औरसमल यांनी भाजपाच्या मानसी काळोखे यांनी आपण सेना-भाजपा-काँग्रेसच्या गटाच्या सदस्य नसल्याचे कळविल्यामुळे, त्या गटाचे संख्याबळ कमी होत असल्याचे कारण देऊन राष्ट्रवादी गटाचे दोन्ही सदस्य नितीन मोरे व निजामुद्दीन जळगावकर यांची व सेनेच्या अमोल जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)