शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीचा ठसका, उत्पादन घटल्याने दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:54 IST

यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे

प्राची सोनवणे  नवी मुंबई : यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांची वर्षभराचा मसाला बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून बाजारात मसाल्याची मिरची आणि अख्खा गरम मसाला घेण्यासाठी महिलांची गर्दी वाढू लागली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मसाल्याच्या मिरचीचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. राज्यात आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातील मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असून दरवर्षीपेक्षा मिरचीच्या भावात या वर्षी वाढ झाली आहे.गतवर्षी आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांना मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे उभे पीक जाळून देण्याची वेळ आली होती. त्यामुळे यावर्षी मिरचीच्या प्रमुख लागवड क्षेत्रात घट झाली आहे. परिणामस्वरूप उत्पादनात घट झाल्यामुळे यावर्षी मागणी जास्त व पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे मिरचीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती विक्रेते किशोर रविपती यांनी दिली. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या प्रांतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होते. आंध्रप्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीमुळे मिरचीचे उत्पादन अधिक होते. गुंटूर परिसरात उत्पादित होणाºया मिरचीला गुंटूर मिरची तर खम्मम परिसरात उत्पादित होणाºया मिरचीस तेजा मिरची म्हणून ओळखले जाते. कर्नाटक प्रांतातील बेडगी परिसरात उत्पादित होणाºया मिरचीस बेडगी मिरची म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातील लाल मिरची तिखट असते; पण रंग फिकट असतो. दीर्घ काळ ही मिरची टिकत नसल्यामुळे या मिरचीस मागणी कमी असते. काळा मसाला बनवण्यासाठी मिरची पावडर उत्पादक याचा वापर करतात तर या परिसरातील शेतकरी लाल मिरची न करता हिरवी मिरचीच दररोज विकून नगदी पैसा मिळवतात. देशभरात जानेवारी ते मे महिन्यापर्यंत घरगुती मिरचीची वार्षिक खरेदी केली जाते. याच काळातील लग्नसराईमुळेही मिरचीच्या मागणीत मोठी वाढ होते.घरगुती मागणी प्रकारात बेडगी, गुंटूर व तेजा या जातीच्या मिरचीला मोठी मागणी आहे. जगभर झणझणीत व जास्त तिखट खाणारे लोक खम्ममची तेजा मिरची वापरतात तर रंगास गडद, चवदार, दीर्घकाळ रंग टिकणारी, कमी तिखट अशी बेडगी मिरची खाणारे उच्चशिक्षित लोक असतात. आंध्र प्रदेशात जानेवारी महिन्यापासूनच गुंटूर, वरंगल, खम्मम, हैदराबाद या बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक असते.ओखी वादळ तसेच अवकाळी पावसामुळे यंदा मिरचीच्या गुणवत्तेत आणि उत्पादनातही घट झाली असून परिणामी, आवक कमी झाल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १२ गाड्या मिरचीची आवक केली जात आहे.गेल्या वर्षी ६० ते ८० रुपये किलो दराने विकली जाणारी मिरची यंदा बाजारात ९० ते १२० रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध असून दरात ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. मसाल्यासाठी कर्नाटकवरून येणारी बेडगी, काश्मिरी, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशमधून येणारी गुंटूर आणि महाराष्ट्रातील तिखट तेजा मिरचीबरोबर आंध्रप्रदेशमधून येणाºया रेशमपट्टी मिरचीलाही मोठी मागणी आहे. महाराष्ट्रीयन जास्त प्रमाणात बेगडी, काश्मिरी आणि तेजा मिरचीचा वापर करतात. रेशमपट्टीला गुजरातीवर्गाकडून मोठी मागणी असते. ही मिरची कमी तिखट असते.