शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलांसाठी पालिकेचे संवेदना उद्यान; राज्यातील पहिला उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:44 IST

ज्ञानेंद्रियांच्या एकीकरणासाठी विकसित केलेली जागा

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : विशेष मुलांच्याही विरंगुळ्यासाठी पालिकेने सानपाडा येथे संवेदना उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात विकलांगांसह विशेष मुलांनाही वेगवेगळे अनुभव घेता येतील, अशा सोयी पुरवण्यात आल्या आहेत. त्याकरिता सुमारे पावणेसात कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.शहराच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी नवी मुंबई महापालिकेने शहरात तब्बल १६३ उद्याने विकसित केली आहेत. यामुळे उद्यानांचे शहर अशीही नवी मुंबईची ओळख होत आहे. अशातच वैशिष्ट्यपूर्ण उद्याने विकसित करण्यावरही पालिकेकडून भर दिला जात आहे. त्यानुसार सानपाडा सेक्टर-१० येथे पालिकेने सुमारे पावणेसात कोटी रुपये खर्चून संवेदना उद्यान विकसित केले आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारचे उद्यान तयार झाले असून, त्यामध्ये विकलांगांसह विशेष मुलांच्या विरंगुळ्याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे. यावरून सर्वसामान्यांप्रमाणेच शारीरिक अपंगत्व असलेल्यांसह दृष्टिहीन अथवा विशेष मुलांच्या बाबतीतही प्रशासन संवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. तर उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांना चालताना त्रास होऊ नये, यासाठी सिन्थॅटिक जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारचा जॉगिंग ट्रॅक शहरात प्रथमच तयार करण्यात आला आहे. तर दिव्यांग व्यक्तीला उद्यानाच्या बाहेरपासून ते आतमध्ये खेळण्यांपर्यंत मनसोक्त वावरता यावे, याकरिता एम्बोस्ड डिझाइनचा ट्रॅक करण्यात आला आहे. तर अपंग मुलांना झोक्याचा आनंद घेता यावा, याकरिता व्हीलचेअरसह बसता येईल, अशा झोक्याची सोय करून देण्यात आली आहे. विशेष मुलांना स्पर्शातून वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता याव्यात, याकरिता संवेदना पथ तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय ब्रेल लिपीतून उद्यानाच्या माहितीसह मुळाक्षरे व अंकांचीही माहिती त्यांना घेता येईल, अशी सोय या उद्यानात करण्यात आली आहे.पालिकेने विशेष मुलांची विशेष काळजी घेत हे उद्यान बनवले आहे. त्यानुसार ज्ञानेंद्रियांच्या एकीकरणासाठी विकसित करण्यात आलेली जागा म्हणूनही हे उद्यान परिचित होणार आहे. त्याकरिता स्वयंसंवेदन (शरीरस्थिती) शरीराचा तोल सांभाळणे, स्पर्शज्ञान, श्रवणज्ञान, दृष्टिज्ञान, गंधज्ञान तसेच चवीचे ज्ञान आदीवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. यामुळे विकलांगांसह विशेष मुलांसाठीचे हे उद्यान संपूर्ण शहरवासीयांचे आकर्षण ठरणार आहे. तर सर्वसामान्यांनाही आकर्षित करेल असा हिरवा गालिचा व विद्युत रोषणाई उद्यानात करण्यात आली आहे.