शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुले पाळणाघरात, आई मतदानकेंद्रात; औषधांच्या पेटीची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:38 IST

मतदान टाळण्याकरिता आता सबब नाही

- सुरेश लोखंडे ठाणे : घरी मुले सांभाळायची होती, त्यांना पाहायला कुणी नव्हते म्हणून मतदान केले नाही, असे सांगण्याची सोय यावेळी मातांना नाही. मतदान केंद्रांवर पाळणाघराची सोय केली आहे. उन्हामुळे डोकेदुखी होईल किंवा चक्कर येईल म्हणून मतदान टाळले, असे सांगायचीही संधी नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर चक्कर, डोकेदुखी किंवा किरकोळ जखमेवरील प्रथमोपचाराची औषधाची पेटी (मेडिकल किट्स) उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आता मतदान टाळण्याकरिता कुठलीही सबब असणार नाही. जिल्ह्णातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तिन्ही मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.या तिन्ही मतदारसंघांमध्ये सुमारे ६२ लाख २५ हजार मतदार आहेत. त्यांच्या मतदानासाठी सहा हजार ७१५ मतदानकेंद्रे निश्चित केली आहेत. घरी लहान मुले असलेल्या महिला बरेचदा आपण मतदानाला गेलो आणि लांबचलांब रांग असेल तर मुलांना कोण सांभाळणार, असा विचार करुन मतदान टाळतात. समजा मुले सोबत घेऊन गेल्या आणि मुलानं रडून गोंधळ घातला किंवा मतदान यंत्राच्या ठिकाणी नेल्यावर यंत्राला हात लावला तर पंचाईत व्हायची, म्हणूनही काहीवेळा माताभगिनी मतदान टाळतात. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी यावेळी प्रत्येक मतदानकेंद्रावर पाळणाघराची सोय केली आहे. मतदानाला येणाऱ्या मातांनी तेथील खेळण्यांसोबत आपल्या मुलांना सोडून मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे, अशी अपेक्षा आहे. मुलांचा सांभाळ करण्याकरिता या पाळणाघरात स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका उपलब्ध आहेत. तसेच मेडिकल किट्स उपलब्ध असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जास्तीतजास्त महिलांनी बालकांसह मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्ह्णातील सर्व मतदान केंद्रांवर पाळणाघरांचे नियोजन केले आहे का व त्यांची नेमकी संख्या किती, असे जिल्हा परिषदेचे महिला, बालकल्याण अधिकारी संतोष भोसले यांना विचारले असता त्यांनी मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अंगलीनिर्देश करून माहिती देण्यास टाळले. वारंवार याबाबत विचारल्यावर आम्हाला तशी माहिती देता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक मतदानकेंद्रांवर पाळणाघर असेल की, काही ठराविक मतदान केंद्रांवर प्रातिनिधीक स्वरुपात ही सोय केली जाईल ते स्पष्ट झाले नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे यांनी मेडिकल किट्ससंदर्भात माहिती दिली. या औषध पेटीत पेनकिलर, पॅरासिटीमॉलच्या गोळ््या, जखमेवर लावायची आयोडीन, बेन्झॉइन ही औषधे असतील. ही औषधे कशी व कशासाठी वापरावी, याची माहिती पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. ते वाचून या औषधांचा वापर बुुथवरील कर्मचारी किंवा स्वत: मतदारालाही करता येणार आहे. अन्यथा, जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचारही करता येणार असल्याचे डॉ. रेघे यांनी सांगितले.असा घेता येईल औषधांचा डोसया मेडिकल किट्समध्ये (बॉक्स) सहा प्रकारच्या औषधी गोळ्या व साहित्य भरण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ओआरएसचे पाकीट असणार आहे. ते लिक्विडच्या स्वरूपात आहे. त्याचा वापर चक्कर येणे, दम लागणे, शरीरातील पाणी कमी होणे, उन्हाळा लागल्यास वापर करता येईल.याप्रमाणेच ‘रेंटेक’ नावाची गोळी आहे. तिचा वापर अ‍ॅसिडिटीसाठी करता येईल. पॅरासिटॉमल ही गोळी डोकेदुखी, अंगदुखी, तापासाठी वापरता येईल. अ‍ॅण्टिसेफ्टिक लिक्विड ही जखम झाल्यावर लावता येईल. जखमेचे रक्त साफ करण्यासाठी कापूस वापरावा लागेल आणि बॉक्समध्ये असलेल्या बॅण्डेजचा वापर त्वचेवर खरचटल्यावर करता येणार असल्याची माहिती डॉ. रेघे यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Navi Mumbaiनवी मुंबई