शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

बालकामगारांची शहरातून सुटका

By admin | Updated: January 30, 2016 02:32 IST

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने १० बालकामगार मुलांची सुटका केली आहे. कोपरखैरणे व वाशी परिसरात विविध हॉटेल व दुकानांमध्ये छापे टाकून पोलिसांनी या कारवाया

नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने १० बालकामगार मुलांची सुटका केली आहे. कोपरखैरणे व वाशी परिसरात विविध हॉटेल व दुकानांमध्ये छापे टाकून पोलिसांनी या कारवाया केल्या आहेत. ही सर्व मुले परराज्यातील असून १३ वर्षांखालील आहेत.बालमजुरीला बंदी असतानाही अनेक ठिकाणी नियम धुडकावून अल्पवयीन मुलांना कामावर ठेवल्याचे पहायला मिळते. शहरातील अनेक हॉटेल, चायनीज सेंटर, चहाच्या टपऱ्या, कॅटरर्स याठिकाणी ही अल्पवयीन मुले काम करत असतात. ही मुले घरातून पळून आल्याची देखील शक्यता असते. त्यानुसार अशा ठिकाणांचा शोध घेवून बालकामगारांची सुटका करण्याची मोहीम गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दोन दिवसात १० बालकामगारांची सुटका त्यांनी केली आहे. त्यासाठी गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे, सहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर आदींचे पथक ठिकठिकाणी छापे टाकत आहे. गुरुवारी त्यांनी कोपरखैरणे परिसरातील हॉटेल, कॅटरर्स, नर्सरी अशा ठिकाणांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये ६ बालकामगार आढळून आले. चौधरी भोजनालय, रसोई भोजनालय, हनुमान नर्सरी, रफिक कॅटरर्स याठिकाणी ही मुले काम करत होती. ते मूळचे बिहार, राजस्थान व उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. त्यांना सी.डब्ल्यू.सी. समोर हजर करुन बालआश्रमात ठेवण्यात आले आहे. तिथून त्यांच्या मूळ गावी पाठवले जाणार आहे. या मुलांपैकी काही जण घर सोडून पळालेले होती तर काही हरवलेले होते. याच पथकाने शुक्रवारी वाशी रेल्वे स्थानक, सेक्टर ९, १७ परिसरात झाडाझडती घेतली. त्यामध्ये ५ बालकामगार पोलिसांना आढळून आले आहेत. तर उर्वरित मुलांच्या वयाची खात्री करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने सहाय्यक कामगार आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांसमक्ष ही मोहीम राबवली. त्यानुसार कोपरखैरणे व वाशी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)