लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अलिबागमधील तळकरनगर येथील तीन मुले पोहण्यासाठी गुरुवारी शहरातील न्यायालयाच्या मागे असलेल्या समुद्रात गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघांपैकी एका आठ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले. ही मुले पोहण्यास गेल्यावर भरतीच्या पाण्याचा प्रवाह वाढत गेला. या मुलांपैकी साहिल सायगावकरला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. काही वेळातच तो पाण्यात बुडाला. पोहायला जात असल्याबद्दल कोणतीही कल्पना या तीन मुलांनी आपल्या घरच्यांना दिली नव्हती. बराच वेळ ही मुले घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोघ सुरू केली. समुद्रावर पोहोचले असता साहिल त्याच्या घरच्यांना पाण्यात तरंगताना दिसला. त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बालकाचा बुडून मृत्यू
By admin | Updated: June 2, 2017 03:30 IST