शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सचिवालयाकडे नवी मुंबई महापालिकेशी संबधित सर्वाधिक तक्रारी

By कमलाकर कांबळे | Updated: September 12, 2022 17:01 IST

राज्य शासनाच्या आदेशानूसार २० जानेवारी २०२० रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

नवी मुंबई - कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात स्थापन करण्यात      आलेल्या ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडेआतापर्यंत १ हजार ४७९ अर्ज प्राप्त झाले असून यात नवी मुंबई महापालिकेशी संबधित सर्वाधिक तक्रार अर्जांचा समावेश आहे. मागील पावणे तीन वर्षात हे सर्व अर्ज निकाली काढल्याची माहिती उपायुक्त महसूल तथा कोकण विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी  मकरंद देशमुख यांनी दिली.

राज्य शासनाच्या आदेशानूसार २० जानेवारी २०२० रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत या कक्षाकडे कोकण विभागातील विविध क्षेत्रातून  १ हजार ४७९ अर्ज व निवेदने  प्राप्त झाली आहेत. त्याप्रैकी ५१२ अर्ज क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठविले आहेत. तर २३० अर्ज मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ७३७ अर्ज विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून निकाली काढले आहेत. कोकण विभागात एकूण १५२ प्रमुख विभागीय कार्यालये आहेत. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे १७३ तक्रारी नवी मुंबई महापलिकेशी संबंधित होते, तर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित ११२ अर्ज होते. तसेच  सिडको    संबंधित १२१ तक्रार अर्जांचा समावेश होता. 

सर्वसामान्य माणसाला त्याचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले गाव, शहर सोडून मुंबईला यावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचावेत या हेतूने हा कक्ष      सुरू करण्यातआला आहे.  त्याचबरोबर क्षेत्रिय पातळीवरचे प्रश्न क्षेत्रियस्तरावरच सुटावेत, या प्रक्रियेला वेग मिळावा ही त्यामागची भूमिका आहे. त्यानुसार आता  मुख्यमंत्र्यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज अथवा निवेदने विभागीय मुख्यमंत्री कक्षाकडून स्वीकारून त्यावर कार्यवाही केली जाते, असे मकरंद देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई