शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांनी टाळले भाष्य

By admin | Updated: January 3, 2017 05:55 IST

पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच महापालिका क्षेत्रात आले होते. त्यामुळे पनवेलच्या विकासाकरिता मुख्यमंत्री

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीपनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच महापालिका क्षेत्रात आले होते. त्यामुळे पनवेलच्या विकासाकरिता मुख्यमंत्री एखादी नवीन घोषणा करतील, असे कयास लावले जात होते. त्याचबरोबर महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळेल, असा आशावाद प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला होता. मात्र सोमवारी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेबाबत चकार शब्दही काढला नाही किंवा कोणतीही घोषणा केली नसल्याने पनवेलकरांच्या पदरी निराशाच पडली.पनवेल महानगरपालिकेचा प्रस्ताव कित्येक वर्षे शासन दरबारी धूळखात पडून होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास समिती स्थापन केली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिसूचना जाहीर केली. एकंदरीतच महापालिकेची स्थापना झाली ती मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक धोरणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासक या परिसराचा कारभार पहात आहेत. सिडकोकडून वसाहती हस्तांतरित करण्याची प्रक्रि या सुरू आहे. मात्र या भागाचा विकास करण्याकरिता प्रशासनाला निधीची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय प्रकल्प राबवता येणार नाहीत तसेच पायाभूत सुविधा पुरवता येणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या अगोदर निधीकरिता प्रस्ताव पाठवला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही विधिमंडळात वीस कोटी रूपये शासनाने महापालिकेला द्यावे अशी मागणी केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनाला खारघर येथे आले होते. त्यावेळी ते याबाबत घोषणा करतील असा आशावाद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला होता. पनवेल मनपाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वानवा आहे. त्याशिवाय ग्रामपंचायतीकडून पालिकेकडे वर्ग झालेले कामगार पगाराविना काम करीत आहेत. याबाबतही मुख्यमंत्री काही बोलतील व हा प्रश्न नवीन वर्षात मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांच्या मागण्या सिडकोने लेखी स्वरूपात मान्य केल्या आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात बैठक झाली होती. याशिवाय प्रकल्पबाधितांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाष्य करणे टाळले.