शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अपघातामुळे रसायनाचा टँकर पेटला

By admin | Updated: June 25, 2016 02:07 IST

भरधाव टँकर पलटी होवून अपघात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाशी खाडी पुलावर घडली. अपघातानंतर टँकरने पेट घेतल्यामुळे सायन-पनवेल मार्गावर

नवी मुंबई : भरधाव टँकर पलटी होवून अपघात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाशी खाडी पुलावर घडली. अपघातानंतर टँकरने पेट घेतल्यामुळे सायन-पनवेल मार्गावर गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. अखेर वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून वेळीच केमिकलच्या टँकरला लागलेली आग विझवली.सायन-पनवेल मार्गावर वाशी खाडी पुलावर गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. चेंबूरवरून आंध्रप्रदेशकडे जाणारा भरधाव टँकर दुभाजकाला घासून मार्गावर पलटी झाला. यावेळी टँकरमध्ये मिथेनलचा मोठ्या प्रमाणात साठा होता. अपघातानंतर काही क्षणातच टँकरने पेट घेतला. रासायनिक द्रवामुळे टँकरचा स्फोट होवून गंभीर दुर्घटनेची शक्यता त्याठिकाणी निर्माण झाल्याने खाडी पुलावरून वाशीकडे येणारी वाहतूक काही वेळेसाठी थांबवण्यात आली होती. शिवाय आगीमुळे टँकरचा स्फोट झाल्यास पुलाला हानी पोचण्याची शक्यता होती. अपघाताची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर टँकरची आग विझून संभाव्य मोठी दुर्घटना टळली. टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार टँकरचालक सुनील यादव (३५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.