शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये एकाच शेतजमिनीची अनेकांना विक्री करून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:49 IST

पनवेलमध्ये शेतजमिनीची बनावट पॉवर ऑफ अटर्नी तयार करून त्या आधारे जमीन वेगवेगळ्या लोकांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पनवेल : पनवेलमध्ये शेतजमिनीची बनावट पॉवर ऑफ अटर्नी तयार करून त्या आधारे जमीन वेगवेगळ्या लोकांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी १० जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला आहे.कोन गावात शकुंतला नारायण म्हात्रे व त्यांची बहीण कुसुम अनंता माळी राहत असून त्यांची आई बाली नामदेव पाटील यांना वारसाहक्काने मौजे वारदोली शिवारात सर्व्हे नं./गट नं.११९/२६ ही जमीन मिळाली होती. आईच्या मृत्यूनंतर ही जमीन शकुंतला म्हात्रे व कुसुम माळी यांना वारसा हक्काने मिळाली आहे. त्यानंतर रवींद्र राणे (एजंट) यांची ओळख २००० मध्ये शकुंतला यांचे पती नारायण म्हात्रे यांच्या सोबत झाली व त्यांनी त्या जमिनीची विक्री करायचे ठरविले. जमीन विकून देतो असे म्हणून रवींद्र राणे याने जमिनीचे टोकन रक्कम म्हणून ५४ हजार रुपयांचा चेक दिला. यावेळी राणेने आणलेल्या कागदपत्रावर दोघी बहिणींचे अंगठे घेऊन सोबत फोटो घेतले. त्यानंतर राणे बरेच दिवस त्यांच्याकडे आला नाही. म्हणून म्हात्रे यांनी राणे याच्याकडे जाऊन जमिनीच्या विक्रीबाबत चौकशी केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तब्बल सहा वर्षांनंतर राणे पुन्हा म्हात्रे यांच्या घरी आला आणि जुना व्यवहार रद्द झाल्याचे सांगून नवीन व्यवहार करून देतो असे सांगून शकुंतला व कुसुम यांचे कागदपत्रावर पुन्हा अंगठे घेतले व दोघींना ७४ हजार रुपये दिले. २०१३ मध्ये शकुंतला यांचा मुलगा किशोर म्हात्रे हा सर्व्हे नं./गट नं. ११९/२६ या जमिनीचा शेतसारा भरण्यासाठी तलाठी कार्यालय, भिंगार याठिकाणी गेला असता त्याला सदरची जमीन ही व्हल्युबल प्रॉर्टीज प्रा.लि.च्या नावाने असल्याचे समजले. यावेळी राणेने फसवणूक केल्याचे म्हात्रे यांच्या लक्षात आले.>तहसील कार्यालयातही खोटी नोंदरवींद्र राणे याने पनवेल तहसील कार्यालयामध्ये दोन वेगवेगळे बनावट पॉवर आॅफ अटर्नी तयार करून त्याच्या आधारे एकाच जमिनीची वेगवेगळ्या लोकांना विक्री केली व त्याचा मोबदला शकुंतला म्हात्रे व त्यांची बहीण कुसुम माळी यांना दिलेला नाही.पनवेल शहर पोलीस ठाण्यात रवींद्र रामदास राणे यांच्यासह १० जणांविरोधात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत.