शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेची फसवणूक

By admin | Updated: March 22, 2016 03:51 IST

घणसोली सेक्टर ३ येथील सेंट्रल पार्कसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा करारनामा होण्यापूर्वीच त्या ठिकाणी काम सुरू करून महापालिका अडचणीत आली आहे.

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईघणसोली सेक्टर ३ येथील सेंट्रल पार्कसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा करारनामा होण्यापूर्वीच त्या ठिकाणी काम सुरू करून महापालिका अडचणीत आली आहे. पार्कसाठी आरक्षित असलेल्या ४४,१२४.९३ चौ.मी. च्या भूखंडाचा काही भाग सिडकोने परस्पर खासगी विकासकाच्या घशात घातल्याचे समजते. त्यामुळे दोन वर्षांनंतरही सदर भूखंड हस्तांतराचा करार होऊ शकलेला नाही.घणसोली सेक्टर ३ येथील ४४,१२४ चौ. मीटरचा भूखंड सेंट्रल पार्कसाठी आरक्षित असल्याच्या कारणावरून कारवाई झालेल्या सावली ग्रामस्थांची घोर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आरक्षणाच्या नावाखाली संपूर्ण गाव उठवल्यानंतर त्या भूखंडाचा काही भाग खासगी विकासकाच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. यामुळे सदर भूखंडाच्या हस्तांतराबाबत सिडको व महापालिका यांच्यात करार होऊ शकलेला नाही. सेक्टर ३ येथील ४४,१२४.९३ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड क्रमांक १ हा सिडकोने सेंट्रल पार्कसाठी आरक्षित ठेवला होता. यानुसार, पार्क विकसित करण्यासाठी भूखंड पालिकेला हस्तांतर करण्यापूर्वी डिसेंबर २००८ मध्ये त्या ठिकाणी संयुक्त कारवाई करण्यात आली होती. मात्र, आठ वर्षे उलटूनही सिडको व महापालिका यांच्यात सदर भूखंड हस्तांतराचा करार झालेला नाही.महापालिकेने सदर भूखंडाचे आहे त्या स्थितीत हस्तांतरण होणार असे गृहीत धरून आॅगस्ट २०१४ मध्ये सेंट्रल पार्कच्या कामाला सुरुवात केलेली आहे, परंतु प्रत्यक्ष ४४,१२४.९३ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड मिळणार असतानाही सिडको महापालिकेला ३८,२६०.९३ चौ.मीटर भूखंड घ्यायला भाग पाडत आहे. मात्र, ४४,१२४ क्षेत्रफळाच्याच अनुषंगाने महापालिकेने त्या ठिकाणी काम सुरू केल्याने त्यामधील ५८६४ चौ.मीटर क्षेत्रफळ वगळून करार करण्याला महापालिकेने नकार दिलेला आहे, तर यावर तोडगा काढण्यासाठी सिडको व महापालिका स्तरावर अनेक बैठकाही झाल्याचे समजते. पार्कसाठी राखीव असलेल्या भूखंडातून वगळलेला ५,८६४ चौ. मीटरचा भूखंड खासगी विकासकाच्या घशात जाणार असल्याची शक्यता आहे. त्याकरिता सदर भूखंडाचे आरक्षण बदलून रहिवासी व वाणिज्य वापराकरिता असे करण्यात आलेले आहे. नियोजन प्राधिकरण असतानाही महापालिकेला सिडकोने अंधारात ठेवून हा प्रकार केलेला आहे. शिवाय वापर बदलाला नगरविकास खात्याची मंजुरी आहे की नाही, याबाबतही साशंकता आहे. सिडकोच्या या अर्थपूर्ण खेळीमुळे महापालिकाही अडचणीत आली आहे. त्याकरिता निवडणूक काळात पार्कच्या कामाच्या शुभारंभाची घाई संबंधितांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. स्थानिक नगरसेवक प्रशांत पाटील व समाजसेवक कृष्णा पाटील यांनीही सदर प्रकाराबाबत गांभीर्य व्यक्त केले आहे. महापालिका व सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधी विचारणा केली असता, त्यांनी मौन बाळगले. महापालिकेने सिडकोकडून भूखंड हस्तांतर झाल्यानंतर कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. यामुळे भूखंडाचा करार होण्यापूर्वीच त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून सेंट्रल पार्कचे काम सुरू करणाऱ्या व पालिकेची फसवणूक करणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकारात दोन्ही प्रशासनांनी सावली ग्रामस्थांसह घणसोलीकरांची घोर फसवणूक केल्याचे दिसत आहे.