शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसला प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक

By admin | Updated: June 2, 2017 06:00 IST

नामांकित महाविद्यालयामध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नामांकित महाविद्यालयामध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. २० लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सागर तानाजी लोहोट व निखिल कटमनी यांचा समावेश आहे. लोहोट याचे पामबीच रोडवरील एनआरआय कॉप्लेक्समध्ये श्री गणेशाय कन्सल्टन्सी असून दुसरा आरोपी गोवा येथे राहणारा आहे. या दोघांनी श्यामसुंदर प्रमोदकुमार गुप्ता याचा भाऊ सुरजकुमार गुप्ता याला एमबीबीएससाठी नामांकित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी संबंधितांकडून २० लाख ९५ हजार रुपये घेतले होते; परंतु प्रत्यक्षात प्रवेश मिळवून दिला नाही. या प्रकरणी संबंधितांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेताना या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करण्याच्या सूचना उपआयुक्त सुधाकर पाठारे, सहायक पोलीस आयुक्त किरण पाटील यांना दिल्या होत्या. या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपुत व स्वप्निल वाघमारे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे सागर लोहोट याचा शोध घेतला व बुधवारी सीबीडीमध्ये त्याला अटक केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अजूनही काही मुलांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.