शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या बिल्डरांच्या संपत्तीवर येणार टाच !

By admin | Updated: May 14, 2016 01:05 IST

पनवेल तालुक्यात स्वस्तात घर बांधून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात तालुका पोलीस ठाणे येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

पनवेल : पनवेल तालुक्यात स्वस्तात घर बांधून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात तालुका पोलीस ठाणे येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिल्डरांच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.पनवेल परिसरात स्वस्त घरांचा भूलभुलैया दाखवून अनेकांकडून लाखो रु पये उकळून बिल्डर पसार झाले आहेत. अनेक ठिकाणी जागा एन.ए. केलेली नसताना देखील अनधिकृत इमारती उभारल्या गेल्या आहेत. तर काही ठिकाणी एकाच रूमवर चार ते पाच ग्राहकांचे बुकिंग उचलल्या गेले आहेत. बुकिंग घेऊन दोन ते तीन वर्षे उलटून गेली तरी देखील बांधकामांचा पत्ता नाही. त्यामुळे ६६६ ग्राहकांनी अद्यापपर्यंत १७ बिल्डरांविरोधात तब्बल १४ कोटी ५५ लाख १५ हजार ८४८ हून अधिक रुपयांची फसवणूक केली असल्याची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात आहे. २0१६ साल उजाडल्यापासून जवळपास १0 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोरया होम्स, हिंदुस्थान होम, स्वप्ननगरी, रियल इंडिया होम्स , अम्रीथ डेव्हलपर्स, तिरुपती बालाजी, स्वप्नपूर्ती होम्स, बजेट होम आदी बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी बैठ्या चाळी तसेच इमारतीच्या रूमचे ठिकठिकाणी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावून जाहिरातबाजीही केली होती. त्यामध्ये विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक जवळ असल्याचे दाखले देत ग्राहकांना भुलवले जात असे. साइट सुरु करतो असे सांगून हजारो ग्राहकांकडून करोडो रुपयांची माया जमा केली मात्र अद्यापपर्यंत या साइटवर कोणत्याही प्रकारचे काम पूर्ण करण्यात आलेले नसल्याच्या तक्र ारी ग्राहकांनी मांडल्या. या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांचे पैसे घेऊन अन्य ठिकाणी जागा घेतल्या आहेत, मात्र ग्राहकांना घरे दिली नाहीत. (वार्ताहर)